आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मुक्त’मध्ये सात लाख प्रवेश पूर्ण, मुदतवाढ दिल्याने वाढला राज्यभरातून प्रतिसाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक; राज्यातील विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता अधिकाधिक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने चारवेळा प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ दिली असून, आजवर राज्यभरात तब्बल सात लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. विद्यापीठाच्या सर्व शिक्षणक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला जूनपासून प्रारंभ झाला होता.

२०१५-२०१६ या शैक्षणिक वर्षाचे सर्व प्रवेश अॉनलाइन पद्धतीने केले जात असून, विद्यार्थ्यांचा त्यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे. समाजातील अनेकांचे विविध कारणांमुळे पदवी पूर्ण करण्याचे स्वप्न अर्धवट राहिल्याने त्यांना पुन्हा प्रवाहात आणून शिक्षणाची संधी देण्यासाठी मुक्त विद्यापीठाने अनेक शिक्षणक्रम सुरू केले अाहेत.

त्यात कला, वाणिज्य विज्ञान क्षेत्रातील जवळपास १७४ विविध प्रकारच्या शिक्षणक्रमांचे पर्याय प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अशा विविध शिक्षणक्रमांचा समावेश आहे. मुक्त विद्यापीठाच्या वतीने चालू शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी यापूर्वी १६ जून, जुलै तसेच १६ जुलै रोजी प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात अाली होती.

अनेक विद्यार्थी प्रवेशासाठी इच्छुक असल्याने विद्यापीठाने १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानुसार तब्बल सात लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी दिली. दरम्यान, पूर्वतयारी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम वर्षासाठी प्रवेशप्रक्रियेत मुदतवाढ करण्याचा विचार विद्यापीठ करत असल्याचेही त्यांनी सांगितले.