आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Yoga Expert Durga Jadhav Going To Foreign For Teaching

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिकच्या दुर्गाला विदेशातून योग प्रशिक्षणासाठी निमंत्रण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - योगशास्त्र हे भारताच्या प्राचीन शास्त्रांपैकी एक असूनही त्याकडे भारतीयांचे बरेचसे दुर्लक्षच झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या दुर्गा पांडुरंग जाधव या अवघ्या पंचवीस वर्षांची युवती नाशिकची पहिली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सचे (एनआयएस ) प्रमाणपत्र मिळविलेली पहिली सर्टिफाइड योगप्रशिक्षक बनली आहे. त्यामुळे तिला आता देशातूनच नव्हे तर सिंगापूर, हॉँगकॉँग आणि कझाखस्तानसारख्या देशातूनही योगाच्या प्रशिक्षणासाठी निमंत्रित केले जात आहे.

योगाचे प्रशिक्षण देण्याचे कार्य आपल्याकडे केवळ परंपरेने शिक्षण केलेले कुणीही देत असतात. तसेच शाळा - महाविद्यालयांमधील क्रीडा शिक्षकदेखील योगाच्या अल्पज्ञानावर योगाचे प्रशिक्षण देण्याचे काम करीत असतात. अशा परिस्थितीत नाशिकच्या दुर्गा जाधव हिने थेट पंजाबमधील पतियाळा येथे असलेल्या स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या योगा प्रशिक्षण केंद्रातून एनआयएस पूर्ण करीत योगाचे विशेष ज्ञान प्राप्त केले. गत बारा वर्षांपासून ज्युडो आणि योगाचे प्रशिक्षण घेत असलेल्या दुर्गाने त्यामुळे नाशिकची पहिली एनआयएस योगा प्रशिक्षक म्हणून मान मिळविला आहे.

तीन महिन्यांपूर्वी मिळविले फिटनेसचे कांस्यपदक
तीन महिन्यांपूर्वी चेन्नईतील मिस फिटनेस राष्ट्रीय स्पर्धेत दुर्गाने मिस इंडिया फिटनेसचे कांस्यपदक पटकावले. त्यावर नेहमीप्रमाणे पश्चिम बंगालचेच वर्चस्व राहिले. मात्र, त्यातदेखील प्रथमच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या दुर्गा जाधव या नाशिकच्या मुलीने मिस फिटनेस इंडीयाचे कांस्यपदक पटकावत प्रथमच महाराष्ट्राला पदक प्राप्त करुन देत नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता.