आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या शाळांत अाता याेगाचे पाठ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अांतरराष्ट्रीयपातळीवर याेग दिन साजरा केला जाऊ लागल्यानंतर अाता महापालिकेच्या शाळांमध्येही याेग अभ्यासाचा राेज एक तास सुरू करण्याची महत्त्वपूर्ण घाेषणा शिक्षण समितीचे नवनिर्वाचित सभापती संजय चव्हाण यांनी केली. यासंदर्भातील प्रस्ताव पहिल्याच सभेत सादर करण्यात येणार अाहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास याेग अभ्यासक्रम नियमित शिकविणारी नाशिक महापालिका इतर सर्व महापालिकांमध्ये एकमेवाद्वितीय ठरणार अाहे.
अाराेग्य संपदा मन:शांतीसाठी याेगाचे महत्त्व अन्यनसाधारण अाहे. ही बाब अांतरराष्ट्रीय पातळीवर मान्य झाल्यानंतर या वर्षापासून २१ जून हा जागतिक याेग दिन म्हणून पाळण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्र महासंघातर्फे घेण्यात अाला अाहे. बालपणापासून याेगाचा शास्त्रशुद्ध अभ्यास केल्यास त्याचा परिणाम अाराेग्यावर निश्चितच हाेत असल्याचा अनेकांचा अनुभव अाहे. त्यादृष्टीने शालेय शिक्षणात याेग अभ्यासक्रमाचा समावेश करण्याचे प्रयत्न केंद्र राज्य सरकारकडून सुरू अाहेत. त्यासाठी मसुदा तयार केला जात अाहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीस वेळ लागण्याची शक्यता असल्याने नाशिक महापालिकेत हा अभ्यासक्रम यंदापासून सुरू करण्याची तयारी शिक्षण समितीचे नवनिर्वाचित सभापती संजय चव्हाण यांनी ‘दिव्य मराठी विकास मंच’ अभियानात दर्शविली. प्रभाग क्रमांक ५४ मध्ये अभियानात एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही महत्त्वपूर्ण घाेषणा केली.
याेग विद्या धाम अाराेग्य विद्यापीठाशी चर्चा करणार
पालिका शाळांतील बहुतांश विद्यार्थी हे अार्थिक दुर्बल घटकांतीलच असतात. त्यामुळे यापुढे त्यांच्या पाेषण अाहाराचा दर्जा सुधारतानाच याेग अभ्यासाद्वारे त्यांच्या अाराेग्याचे संवर्धन करण्यात येणार अाहे. अभ्यासातच याेग विषयाचा समावेश केला जाईल. याेग विद्या धाम अाराेग्य विद्यापीठ यांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल. संजय चव्हाण, सभापती,शिक्षण समिती