आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाखत - सुदृढ आरोग्यासाठी तरुण-तरुणींनो, योगा करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आज कालतरुण पिढीला विसाव्या वर्षापासूनच आजारांना सामोरे जावे लागत आहे. कुणाला हृदयाचा त्रास, कुणाला मणक्यांचा तर कुणी मानसिक आजारांनी त्रस्त आहे. विविध आजाराने पीडित अशा या तरुणाईला आरोग्यदायी आणि सक्षम बनविण्याचे काम योगासन, योगशास्त्र चोख करू शकते. म्हणूनच सुदृढ आरोग्यासाठी प्रत्येक तरुण-तरुणींनी योगासने करायलाच हवीत. योगासनांच्या माध्यमातून नवीन पिढी चांगली घडेल, असे मत योग पंच अनिता पाटील यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केले.


योग फेडरेशन इंडियातर्फे बँकॉकला होणाऱ्या इंटरनॅशनल योगासन स्पर्धेसाठी पंच म्हणून अनिता पाटील यांची नविड झाली आहे. महाराष्ट्रातून त्या एकमेव पंच असून महिला म्हणूनही त्यांचा पहिला क्रमांक लागतो. या नविडीनंतर 'दिव्य मराठी'ने त्यांच्याशी तरुणाईचे आरोग्य त्यांनी या क्षेत्रात मिळविलेल्या यशाबद्दल चर्चा केली ती त्यांच्या शब्दात...


अनेक जण झाले बरे
तरुण पिढी योगापासून दूर गेल्याने त्यांना याकडे वळवण्यासाठी संगीताच्या तालावर योगा हा प्रकार तयार केला आहे. त्यामुळे तरुणांचा आज मोठ्या प्रमाणात यात सहभाग वाढला आहे. अनेक जण योगा केल्याने बरे झाले आहेत. वदि्यापीठात सुधीर मेश्राम यांच्या प्रोत्साहनाने अनेक थीमचे सादरीकरण केले.


लग्नानंतर पूर्ण केले पुढील शिक्षण
बीएसस्सीच्याप्रथम वर्षीच माझे लग्न झाले. पती सतीश पाटील यांच्या मदतीने अन् प्रोत्साहनाने मी लग्नानंतर सगळे शिक्षण पूर्ण केले. बीए, बीएसस्सी, डिप्लोमा इन नॅचरोपॅथी अॅण्ड योगिक सायन्स, एम. ए. योग, डी फार्म, डीएमएलटी अशा अनेक प्रकारचे शिक्षण मी घेतले. मेडिकल चालविताना मला योगाची आवड निर्माण झाली. त्यामुळे मग मी योगाच्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागली. एवढेच नव्हे तर मी योगाच्या योग परीक्षकाची परीक्षा दिली. त्यानंतर एम.ए. योग हे अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातून पूर्ण केले तर एनआयएस पंजाबमधील पतियाळामधून केले आहे.


संगीताच्या तालावर योगाचे प्रात्यक्षिके
मी आतापर्यंत १०० खेळाडूंना रिदमिक योगा या प्रकारात तयार केले आहे. फेडरेशनतर्फे रिदमिक योगा हा प्रकार उदयास आला. त्यानंतर मी माझ्या विविध कल्पनेचा वापर करून अनेक थीमचा वापर केला आहे. त्यामुळेच तर मी आज संगीताच्या तालावर योगासनांचे अनेक प्रात्यक्षिके आकर्षक पद्धतीने सादर करू शकते. मुलींना देखील मी अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले आहे. पर्यावरण, योगामुळे व्यक्तमित्त्व कसे घडते, स्वातंत्र्य दिन, राजेश खन्ना यांच्या गीतांवर भावनिक, कॅन्सर आजारापासून सावध राहा, आरोग्याचे रक्षण करा, यावर मी अनेक प्रात्यक्षिके सादर केली आहे.

फोटो - अनिता पाटील