आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांग मुलीशी विवाह; युवकाने ठेवला अादर्श

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दिव्यांग म्हटले म्हणजे त्यांच्या नशिबी यातना ठरलेल्याच. त्यात मुलगी दिव्यांग असली तर त्यांचा सांभाळ करणे हे एक दिव्यच असते. अशा मुलीला अापली जीवनसाथी म्हणून सहसा काेणताही धडधाकड युवक स्वीकारत नाही. मात्र, निजामपूर येथील लामकणीच्या युवकाने ही बाब खाेटी ठरवत चक्क एका दिव्यांग मुलीची जीवनसाथी म्हणून निवड केली. या दाेघांचा विवाह नुकताच साध्या पद्धतीने करून त्यांनी समाजापुढे वेगळा अादर्श ठेवला अाहे. 
दिव्यांग मुला-मुलींना अापल्या दैनंदिन जीवनात वावरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागताे. काही दिव्यांगांना तर दुसऱ्यावरच अवलंबून राहावे लागते. काही प्रमाणात दिव्यांगांनी स्वत:च्या हिमतीवर अापल्यातील कमतरतेकडे दुर्लक्ष करून सर्वसामान्यांसारखे कर्तृत्व केल्याच्या घटना समाजात बघण्यास मिळतात. अशीच एक घटना नंदुरबार जिल्ह्यात चर्चेत अाली. लाडशाखीय वाणी समाजातील छडवेल काेर्डे येथील नामांकित व्यापारी संजय नरहर काेठावदे यांची भगिनी याेगिता दिव्यांग (एका पायाने अपंग) असल्याने त्यांनी तिच्या लग्नाचा विचार साेडला हाेता. मात्र, एका कार्यक्रमानिमित्ताने ते निजामपूर येथील दगडू भटू पाटील या त्यांच्या नातलगांकडे गेले हाेते. तेव्हा त्यांनी मुलीचा विषय छेडून शेवटी मुलगी अाहे. लग्न करून टाकू असा विषय मांडला. त्यानुसार निजामपूर येथील लामकाणी येथील भरत चंद्रकांत माेराणकर या युवकास मुलगी दाखविण्यात अाली. 

भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या भरतने कुटुंबियांना मुलगी अावडल्याचे सांगून लग्नास तयारी दर्शविली. भरतचे वडील चंद्रकांत रामचंद्र माेराणकर यांनीही मुलाच्या अावडीचे काैतुक करुन या विवाह साेहळ्यास मान्यता दिल्याने हा आदर्श विवाह सोहळा जुलै २०१७ रोजी नंदुरबार येथील शिवाजी नाट्यगृहात थाटात पार पडला. 

विशेष म्हणजे लाडशाखीय वाणी समाजात लग्नासाठी माेठ्या प्रमाणात खर्च केला जाताे. मात्र, काेठावदे आणि माेराणकर कुटुंबियांनी साध्या पद्धतीने लग्न समारंभ करून समाजापुढे एक अनोखा अादर्श निर्माण केला अाहे. 

या विवाहाचा आदर्श सर्व समाजबांधवांनी घ्यावा 
^एका अपंगमुलीची संसाररुपी नाव भरत मोराणकर यांनी ताब्यात घेतली तिचा संसार चालु केला. अशा या लक्ष्मी-नारायणाच्या जोडीचा संसार सुखात चालो त्यांची नाव पैलतिरी जावो. -दगडु पाटील, सामाजिक कार्यकर्ते, लाडशाखीय वाणी समाज 
 
बातम्या आणखी आहेत...