आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेशन कार्डसाठी तहसील कार्यालयामध्ये गणोरीच्या युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - रेशनकार्ड बनवण्यासाठी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याने पैसे मागितले म्हणून गणोरी येथील युवकाने बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आत्महत्येचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेऊन रुग्णालयात भरती केल्याने युवकाचा जीव वाचला.

तालुक्यातील गणोरी येथील प्रशिक खंडारे हा युवक अकोला तहसील कार्यालयात २१ ऑक्टोबर रोजी दुपारी नातेवाइकांचे रेशन कार्ड घेण्यासाठी आला होता. सोमवारीच त्याने नातेवाइकांचे रेशन कार्ड बनवण्यासाठी अर्ज सादर केला होता. मात्र, शिंगणे नामक लिपिकाने त्याला रेशन कार्डासाठी आणखी विलंब लागेल, असे सांगत साहेबांची सही व्हायची आहे.

तुम्ही नंतर या, असे सांगितले. त्या युवकाने काहीही करा साहेब पण मला रेशन कार्ड द्या, अशी विनवणी केली. मात्र, लिपिकाने कोणताही रिस्पान्स दिल्याने तहसील कार्यालयाच्या आवारातच त्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांनी त्याला तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. वेळेवर उपचार मिळाल्याने त्या युवकाची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

कर्मचाऱ्याची चूक नाही
^याप्रकरणात कुठेही संबंधित लिपिकाचा दोष नाही. हा युवक त्याच्या नातेवाइकांच्या रेशन कार्डसाठी आला होता. रेशन कार्डवर स्वाक्षरी राहिली असल्याचे लिपिकाने सांगितले होते.'' संतोष शिंदे, तहसीलदार, अकोला.
बातम्या आणखी आहेत...