आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिशीच्या पैशांसाठी युवकाचे अपहरण, नाशिकमधील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरात काेम्बिंग अाॅपरेशन सुरू असताना गंगापूरराेड परिसरात चार जणांच्या टोळक्याने एका युवकाचे अपहरण करून त्यास रो-हाऊसमध्ये डांबून ठेवत भिशीच्या पैशांची मागणी करत चाकूने वार करून त्यास जखमी केले. शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात चार संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि किशोर इप्पर (३६, रा. अंबड) यांच्या फिर्यादीनुसार संशयित अमोल बोराडे, राहुल मुसळे, किरण शिंदे आणि अभय पवार यांनी भिशीच्या पैशांसाठी चाकूचा धाक दाखवत गंगापूरराेड परिसरातील चव्हाण मळा आणि अन्य ठिकाणी फिरवत गंगापूर परिसरातील रो-हाऊसमध्ये डांबून ठेवले. चाकूचा वार करून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. पैसे देऊ, असे सांगितल्यानंतर संशयितांनी सोडून दिल्याची तक्रार युवकाने पोलिसांत केली. सुरुवातीला पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली होती. या प्रकरणी गंगापूर पोलिसांत शनिवारी सायंकाळी संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. निरीक्षक महेश देवीकर तपास करत आहेत. संशयित सिडको-अंबड परिसरातील सराईत गुन्हेगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला अाहे.
बातम्या आणखी आहेत...