आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उड्डाणपुलावर दुचाकीला अपघात, तरुण जागीच ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीस्वाराने नादुरुस्त कंटेनरला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला. गुरुवारी (दि. २४) सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास उड्डाणपुलावर हा भीषण अपघात घडला. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैन ओसवाल बोर्डिंग येथे राहणारा वेदांत जैन (वय २२, मूळ रा. मुक्ताईनगर, जळगाव) हा तरुण सायंकाळी वाजेच्या सुमारास के. के. वाघ महाविद्यालय परिसरात गेला होता. सायंकाळी अॅक्टिव्हावरून ताे के. के. वाघजवळील उड्डाणपुलावर भरधाव वेगात रॅम्पवर चढला. स्वामिनारायण मंदिराच्या समोर पुलावर नादुरुस्त कंटेनर (एमएच ४६, एफ १४६९) उभा होता. पुढे जाणाऱ्या एका वाहनाला ओव्हरटेक करत असताना भरधाव वेगात कंटेनरवर जाऊन अॅक्टिव्हा अादळली. हा अपघात इतका भीषण होता की, यात दुचाकीचा चक्काचूर झाला. दुचाकीच्या धडकेने कंटेनरचे मागील फाळके चेपले गेले. वेदांतच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. वाहतूक विभागाचे सहायक निरीक्षक प्रवीण कदम यांना माहिती मिळताच उड्डाणपुलावर धाव घेत जखमी युवकास रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात पाठवले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
अपघाताची माहिती समजताच जैन ओसवाल बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी सिव्हिलमध्ये गर्दी केली. दरम्यान, उड्डाणपुलावर दुचाकी, रिक्षा आणि अन्य लाहन वाहनांना प्रवेश बंद असूनही दुचाकीसह रिक्षा सर्रासपणे उड्डाणपुलावरून ये-जा करतात. वाहतूक विभागाने कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...