आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापूर धबधब्याजवळ युवकाचा खून; धारदार शस्त्राने केले वार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गंगापूर धबधबा परिसरात पंचवटीच्या दुर्गानगरातील अाकाश बाळू सूर्यवंशी (२२) या युवकाचा मृतदेह सापडला अाहे. मृतदेहावर धारदार शस्त्राचे वार करण्यात अाल्याने गंगापूर पाेलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला अाहे.
याबाबत पाेलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, के. के. वाघ काॅलेजच्या पाठीमागील परिसरात राहणारा अाकाश मंगळवारी (दि. १८) दुपारी दाेन वाजेच्या सुमारास त्याचे मित्र रत्नाकर गरुड, राजाभाऊ कटारे रूपचंद कडाळे यांच्यासाेबत रिक्षात बसून गेला हाेता. त्यानंतर ताे घरी परतलाच नाही. बुधवारी दुपारी पाेलिसांना जलालपूरकडे जाणाऱ्या निर्जनस्थळाच्या परिसरातील कपारीत युवकाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली हाेती. पाेलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन चाैकशी केली असता मृतदेह अाकाशचा असल्याचे निष्पन्न झाले हाेते. त्याच्या डाेक्यावर छातीवर धारदार शस्त्राचे वार करण्यात अाले अाहेत. वडील बाळू सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला अाहे. पाेलिस निरीक्षक देवीकर या प्रकरणाचा तपास करीत अाहेत. पाेलिसांच्या दुर्लक्षामुळे धबधबा परिसर अांबटशाैकिन तळीरामांचा अड्डा बनला असल्याने या परिसरात नेहमीच गुन्हेगारी दुर्घटना घडत असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले.

धबधब्याकडे पर्यटकांची पाठ
^धबधबा परिसरपर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात अाहेत. या परिसरात दिवसाढवळ्या प्रेमीयुगुले अश्लील चाळे करीत असल्याने मद्याच्या पार्ट्या हाेत असल्याने धबधब्याकडे पर्यटक हळूहळू पाठ फिरवू लागले अाहेत. पाेलिसांनी या परिसरात गस्त वाढवावी. -विलास शिंदे, नगरसेवक
बातम्या आणखी आहेत...