आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजीची बाजू घेणाऱ्या मोठ्या भावाचा लहान भावाकडून खून, पंचशीलनगर येथील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘आजीला शिवीगाळ का करतो’ अशी विचारणा करत मोठ्या भावाने लहान भावाला समजावून सांगण्याचा प्रयत्न मोठ्या भावाच्या जीवावर बेतला. मोठा भाऊ आजीची बाजू घेतो, याचा राग आल्याने लहान भावाने मोठ्या भावाला चाकूने भोसकून खून केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि. २) रात्री १२ वाजता गंजमाळ परिसरातील श्रमिकनगर येथे घडला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
या प्रकरणी अशोक उर्फ रफिक किसन गायखे (रा. गंजमाळ) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार रात्री रिक्षामध्ये झोपले असताना त्यांचे आजीला शिवीगाळ केल्याचा जाब भाचे शिवराम बालाजी एखंडे (वय २२) आणि सागर (वय १८) या दोन भावांमध्ये वाद सुरु होते. सागर हा आजी बबाबाई हीस शिवीगाळ करत होता. तर शिवराम आजीची बाजू घेत सागरला समाजवत असतांना दोघांमध्ये हणामारी झाली. भाडंण सोडवण्याचा प्रयत्न केला असता सागरने भांडणात पडू नका, असे सांगत गायखे यांना शिवीगाळ केली. दोघांमध्ये झटापट सुरू असतांना घराबाहेरच्या मोरीत ते आले. तेथे सागरने शिवरामच्या पोटात छातीत चाकूने वार केले. 

लहान भाऊ मनोज सोडवण्यास गेला असता त्याच्या तोंडावर बुक्की मारुन ताे पळून गेला. गंभीर जखमी अवस्थेत शिवराम यास जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच डॉक्टरांना त्यास मृत घोषीत केले. घटनेची माहिती मिळताच उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ निरिक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुुरू केला. 
बातम्या आणखी आहेत...