आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन गुन्हेगारीत महाराष्ट्र देशात अव्वल; दिल्लीपेक्षाही गुन्हे दुप्पट, रेपचेच अधिक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अल्पवयीनमुलांनी केलेले बलात्कार, खून, चोऱ्या आणि अपहरण या गुन्ह्यांमध्ये देशात गेल्या वर्षभरात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यांचे महाराष्ट्रातील प्रमाण लक्षणीय आहे.

सन २०१५ मध्ये अल्पवयीन गुन्हेगारांनी केलेल्या हजार ४६ गुन्ह्यांची नोंद देशभरात झाली. त्यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे हजार २७९ गुन्हे नोंदवण्यात आले. दिल्लीतील (६६९) गुन्ह्यांपेक्षाही महाराष्ट्रातील अल्पवयीन गुन्हेगारांच्या गुन्ह्यांचे प्रमाण दुप्पट आहे. यात सर्वात जास्त म्हणजे १६८८ गुन्हे बलात्काराचे आहेत. त्यात मध्य प्रदेशातील २८२, महाराष्ट्रातील २४७, राजस्थानातील १६६, छत्तीसगडचे १३४, उत्तर प्रदेशातील १२५ घटना आहेत. त्याखालोखाल ८५३ खुनाचे गुन्हे आहेत. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे १२८ गुन्हेगार महाराष्ट्रातील आहेत. त्यानंतर मध्य प्रदेश (८७), राजस्थान (६५), उत्तर प्रदेश (६४), दिल्ली (६४), तामिळनाडू (६३) आणि गुजरात (६१) अशी गुन्ह्यांची नोंद आढळते. खुनाच्या प्रयत्नांमध्येही महाराष्ट्रातील अल्पवयीन मुलांची संख्या अधिक आहे. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात असे १८८ गुन्हे नोंदवण्यात आले. त्याखालोखाल बिहार (१२३), मध्य प्रदेश (११८), तामिळनाडू (८७) असे एकूण ९८० गुन्हे नोंदवण्यात आले. जबरी चोऱ्या आणि अपहरण या गुन्ह्यांमध्येही अल्पवयीनांचा सहभाग वाढत असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते. या वर्षभरात देशभरातील १३५८ जबरी चोरीच्या गुन्ह्यांमधील प्रमुख संशयित अल्पवयीन आहेत. त्यांच्यापैकी ४५७ दिल्लीमधील आहेत, तर ३३६ महाराष्ट्रातील. अपहरणांच्या १६३० गुन्ह्यांमधील आरोपी अल्पवयीन आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजे २९९ मध्य प्रदेशातील आहेत, तर १४७ महाराष्ट्रातील आहेत.

गेल्या पाच वर्षांची आकडेवारी पाहता, महाराष्ट्रात अल्पवयीन मुलांनी केलेल्या गुन्ह्यांची संख्या लक्षणीय वाढल्याचे दिसते. सन २०११ मध्ये देशभर झालेल्या गुन्ह्यांच्या घटनांपैकी २३ लाख २५ हजार १२५ गुन्हे २५,१२५ अल्पवयीन मुलांनी केले होते. सन २०१५ पर्यंत यात लक्षणीय वाढ झाली. गेल्या वर्षी ३१ हजार ३९६ अल्पवयीन गुन्हेगारांनी २९ लाख ४९ हजार ४०० गुन्हे देशभर केल्याची नोंद नॅशनल क्राइम रिपोर्टमध्ये करण्यात आली आहे.

वर्ष गुन्हेगार एकूण गुन्हे
२०१२-२७९३६२३,८७,१८८
२०१३-३१ ७२५२६,४७,७२२
२०१४-३३ ५२६२८,५१,५६३
२०१५-३१ ३९६२९,४९,४००
बातम्या आणखी आहेत...