आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न; युवकास चोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - दीडवर्षे वयाच्या बालिकेस पळवून नेण्याचा प्रयत्न करणा-या मुलाला पाठलाग करत पकडून चोप दिल्याची घटना सोमवारी दीपालीनगरात घडली. संतापलेल्या महिलांनी या मुलाला इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात दिले.
सोमवारी दुपारच्या सुमारास दीपालीनगरातील एका अपार्टमेंटमध्ये ही मुलगी खेळत होती. हा मुलगा तेथे आला त्याने तिला उचलले. तिला गच्चीवर नेत असतानाच एका महिलेने पाहिले. हा प्रकार महिलांना कळताच त्यांनी आरडाओरड केली. हे ऐकून त्या मुलाने मुलीला खाली टाकून पळण्याचा प्रयत्न केला. महिलांसह काही नागरिकांनी पाठलाग करून त्याला पकडले. महिलांनी त्याला तिथेच बेदम चोप दिला इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

युवकाकडूनदिशाभूल : याघटनेतील मुलगा अल्पवयीन असला तरीही तो दिशाभूल करत आहे. कधी मानसिक रुग्णासारखा वागत असला तरीही, तो मुलींची छेड काढण्यात सराईत आहे. लहान मुलींशी तो अश्लील चाळे करत असल्याची तक्रार काही महिलांनी केली आहे.