आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचारावरून धमकावल्याने युवकाने केली आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला - ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधी पॅनलच्या उमेदवारांचा प्रचार केल्याने सत्ताधारी जनसेवा पॅनलच्या नेत्याने सातत्याने धमकाविल्याने शनिवारी सकाळी निमगाव मढ येथील एका युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी माजी सरपंचाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

अशोक बयाजी लभडे यांच्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा दत्तात्रय साई परिवर्तन पॅनलचा प्रचार करीत होता. त्यावेळी ‘तू विरोधी पॅनलचा प्रचार करू नको, नाही तर तुला जगू देणार नाही’, अशी धमकी जनसेवा पॅनलचे नेते माजी सरपंच नवनाथ बबन लभडे यांनी दिली होती. प्रचारादरम्यान दोन्ही पॅनलच्या समर्थकांत वाद झाल्यानंतर नवनाथ लभडे यांनी दत्तात्रयसह इतर सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर दत्तात्रय विमनस्क अवस्थेत होता. तसेच दत्तात्रयला मोबाइलवरही धमकावले जात होते. शनिवारी सकाळी वाजता चारा आणायला जातो, असे सांगून दत्तात्रय गेला. परंतु, परतलाच नाही. त्यानंतर त्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एस. पी. निकम करीत आहेत.