आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक-दुचाकी अपघातात तरुण ठार, चेहडी शीव येथे अपघात, ट्रकचालकावर गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भरधाव जाणाऱ्या ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणारी दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे राेडवरील चेहडी शीव येथे हा भीषण अपघात घडला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांत ट्रकचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अाशुताेष अनिल उबाळे (वय २२, रा. युगंधर सोसायटी, जेलरोड) हा तरुण सायंकाळी चेहडी शीव येथे मावशीकडे प्रसादासाठी गेला होता. परतताना पुण्याकडून नाशिकरोडकडे येणाऱ्या ट्रकने (एमए १२ एफझेड ९१५७) अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागून पल्सर दुचाकीने येत असलेल्या अाशुताेषचा गोंधळ उडला. समोरून येणाऱ्या वाहनांना वाचवण्याच्या नादात ताे ट्रकला जाऊन धडकला. डोक्यास गंभीर मार लागल्याने नागरिकांनी खासगी रुग्णालयात त्याला दाखल केले. मात्र, तेथे उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वाहतूक शाखेचे कर्मचारी अनिल उबाळे यांचा तो एकुलता एक मुलगा होता. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उबाळेंचे सांत्वन केले.
बातम्या आणखी आहेत...