आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकांचा जाहीरनामा स्वतंत्रपणे सादर हाेणार, युवकांकडून जाणून घेतल्या जात आहेत युवक आणि युवतींच्या अपेक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - निवडणुकांसह एकूणच व्यवस्थेत युवकांचे स्थान महत्वपूर्ण ठरत असल्यामुळे युवकांसाठी स्वतंत्र जाहीरनामा असावा अशा विचाराने नाशिकमधील काही विद्यार्थी एकत्र अाले अाहेत. त्यांनी अशा प्रकारचा जाहीरनामा तयार करण्यास सुरुवात केली असून या जाहीरनाम्यात अाणखी काय असावे या विषयी युवकांची मतेही घेतली जात अाहेत.
 
युवक म्हणजे देशाचा अाधारस्थंभ अाहे. देशाचे भविष्य त्याच्याच हातात अाहे असे म्हटले जाते. परंतु निवडणुकांमध्ये या वर्गाचा फारसा विचारच केला जात नाही. या पार्श्वभूमीवर भूषण काळे, कमलेश काळे, राम शेटे, गीतांजली खताळे, महिमा नाईकवाडे, शारीक शेख, प्रियदर्शन भारतीय, कृतार्थ कंसारा, अमाेल गायकवाड, शुभम कीर्तने अादींनी युवकांचा जाहीरनामा तयार करण्याचे काम हाती घेतले अाहे. 
 
युवकांचे प्रश्न प्रकाश झाेतात अाणणे हा या जाहीरनाम्याचा प्रमुख उद्देश अाहे. या जाहीरमान्यात नक्की काय असावे याविषयी सूचना अपेक्षा व्यक्त करण्यासाठी ८९७५५२१२३२ या व्हॉट‌्सअॅप क्रमांकावर संपर्क साधण्याचे अावाहन भूषण काळे यांनी केले अाहे. 
बातम्या आणखी आहेत...