आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिन्नर तालुक्यात तरुण शेतकऱ्याची कर्जामुळे अात्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक/ सिन्नर - जिल्ह्यातील आत्महत्यांमध्ये दररोज वाढ होत असून, मोह येथील शेतकरी दादा पुंजा बोडके (३५) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. मोह तसेच कणकोरी येथे त्यांच्या नावे कोरडवाहू क्षेत्र आहे. त्यासाठी हात उसने घेतलेल्या ५० हजार रुपयांसह एका पतसंस्थेचे त्यांच्यावर एक लाख रुपयांचे कर्ज असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सिन्नरमध्ये या वर्षी ही तिसरी, तर जिल्ह्यात जानेवारीपासून अवघ्या अडीच महिन्यांत तब्बल१६ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याची नोंद झाली आहे.सिन्नर तालुक्यात यापूर्वी मानोरी आणि खंबाळे येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. या घटना रोखण्यास शासन-प्रशासन अपयशी ठरत असल्याचेच यातून स्पष्ट झाले आहे.

दादा बोडके नातेवाइकांना अस्वस्थ आढळून आले. विषप्राशन केल्याचे समजल्यानंतर त्यांना तत्काळ नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. नाशिक जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बोडके यांच्या पश्चात पत्नी अाणि दोन मुले आहेत. दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि नापिकीने त्रस्त असलेला बळीराजा झालेले कर्ज, मुला-मुलींचे लग्न कसे करायचे, या विवंचनेमुळे थेट जीवनच संपवित आहे. सिन्नरमध्ये तीन आत्महत्या झाल्या असून, निफाडमध्ये पाच जणांनी आपले जीवन संपविले आहे. कळवणमध्ये दाेन आत्महत्यांची नोंद झाली आहे. १६ पैकी जानेवारीत ३, फेब्रुवारीत आणि मार्च महिन्यात १८ दिवसांतच जणांनी आपले जीवन संपविले आहे. त्यामुळे शासन केवळ मदतीचा दिलासा देत असून, दिली जाणारी मदतही अत्यंत तुटपुंजी असल्याने तिचा फारसा उपयोगच होत नसल्याचे जिल्ह्यात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, शासनाने बळीराजाला सक्षम आणि त्याचे समुपदेशन करण्यासाठी उपक्रम राबविण्याचे आदेश दिले आहेत. ऑक्टोबरमध्येच काढलेल्या या आदेशाला स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून केराची टोपली दाखविली जात आहे. प्रशासन ३१ मार्च असल्याने वसुली आणि वर्षभरात झालेल्या खर्चाच्या लेखाजोख्यालाच अधिक प्राधान्य देत आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या शेतकरी समुपदेशनाच्या उपक्रमाला दुय्यम स्थान दिले जात असल्याचेच यातून स्पष्ट झाले आहे.

तब्बल१६ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविल्याची नोंद झाली आहे. सिन्नर तालुक्यात यापूर्वी मानोरी खंबाळेच्या शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. या घटना रोखण्यास शासन-प्रशासन अपयशी ठरत असल्याचेच स्पष्ट झाले आहे. दादा बोडके नातेवाइकांना अस्वस्थ आढळून आले. विषप्राशन केल्याचे समजल्यानंतर त्यांना तत्काळ नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. नाशिक जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बोडके यांच्या पश्चात पत्नी अाणि दोन मुले आहेत. दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि नापिकीने त्रस्त असलेला बळीराजा झालेले कर्ज, मुला-मुलींचे लग्न कसे करायचे, या विवंचनेमुळे थेट जीवनच संपवित आहे. सिन्नरमध्ये तीन आत्महत्या झाल्या असून, निफाडमध्ये पाच जणांनी आपले जीवन संपविले आहे. कळवणमध्ये दाेन आत्महत्यांची नोंद झाली आहे. १६ पैकी जानेवारीत ३, फेब्रुवारीत आणि मार्च महिन्यात १८ दिवसांतच जणांनी आपले जीवन संपविले आहे. त्यामुळे शासन केवळ मदतीचा दिलासा देत असून, दिली जाणारी मदतही अत्यंत तुटपुंजी असल्याने तिचा फारसा उपयोगच होत नसल्याचे जिल्ह्यात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, शासनाने बळीराजाला सक्षम आणि त्याचे समुपदेशन करण्यासाठी उपक्रम राबविण्याचे आदेश दिले आहेत. ऑक्टोबरमध्येच काढलेल्या या आदेशाला स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून केराची टोपली दाखविली जात आहे. प्रशासन ३१ मार्च असल्याने वसुली आणि वर्षभरात झालेल्या खर्चाच्या लेखाजोख्यालाच अधिक प्राधान्य देत आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या शेतकरी समुपदेशनाच्या उपक्रमाला दुय्यम स्थान दिले जात असल्याचेच स्पष्ट झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...