आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘युवा स्पंदन’मध्ये रंग एकांकिका, मिमिक्रीचे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - इंटरनेटचा तरुणांवर होणारा परिणाम, तरुणांचे नेट अाॅडिक्शनवर तयार केलेली एकांकिका ‘नेटिझन्स’, आजच्या काळातील नात्यांवर प्रकाशझोत टाकणारी एकांकिका ‘विनचिटर्स’, ‘सतरंगी भाईजान’, ‘मिशन -२०२०’ अशा वेगवेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या तब्बल.... एकांकिका मराठा विद्याप्रसारक समाज आयोजित ‘युवास्पंदन -२०१६’ मध्ये सादर झाल्या. याचबरोबर पाच महाविद्यालयांनी मिमिक्रीदेखील सादर केली.

मराठा विद्याप्रसारक संस्थेशी संलग्न सर्व महाविद्यालयातील कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन स्तरावर ‘युवास्पंदन’ स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धांची विभागीय फेरी त्या त्या महाविद्यालयात पार पडली असून, अंतिम फेरीचा दुसरा टप्पा दि.(७) डिसेंबर रोजी रावसाहेब थोरात सभागृहात पार पडला. यामध्ये एकांकिका आणि मिमिक्री हे दोन कलाप्रकार सादर करण्यात आले.
महाविद्यालयीन तरुणांच्या तसेच तरुणांशीच मात्र विविध मार्गाने निगडीत अशा विषयांवरील एकांकिका सकाळी वाजेपासून घेण्यात येत होत्या. दुपारच्या सत्रापर्यंत महर्षी शिंदे अध्यापक विद्यालय नाशिक यांची ‘आत्मविश्वास’ ही विद्यार्थी दशेत असताना आत्मविश्वासाचे महत्त्व सांगणारी एकांकिका सादर झाली. तसेच डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या ‘विजन मिशन २०२०’ या स्वप्नाला दिशा देणारी ‘मिशन २०२०’ ही एकांकिका सादर झाली. यासह सप्तरंगी भाईजान ही हलकी फुलकी एकांकिका, विंडचिटर ही हळूवार कहाणीदेखील सादर झाली.

यानंतर नाशिक आणि नांदगावच्या मविप्र संचलित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिमिक्री सादर केल्या. यामुळे सभागृहामध्ये हास्यलाट पसरली होती. राजकुमार, निळू फूले, नाना पाटेकर, दादा कोंडके, सुनील शेट्टी, सनी देओलसारख्या नटांच्या नकला विद्यार्थ्यांनी सादर केल्या. या स्पर्धेमध्ये उद्या. दि.(८) डिसेंबर रोजी एकल नृत्य, समूह नृत्य, लोकनृत्य या प्रकारातील स्पर्धा पार पडणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...