आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हास्तरीय युवक महोत्सव रंगला, विविध कलांचा अाविष्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, उदो गं उदो बोला आईचा डोंगर, गुचकी आदी बहारदार समूहनृत्य शास्रीय नृत्यांनी रावसाहेब थोरात सभागृहात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केटीएचएम महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवक महोत्सव रंगला. 
 
विद्यापीठस्तरीय या युवक महोत्सवातून अंतिम फेरीसाठी मंगळवारी (दि. ३) निवड चाचणी रावसाहेब थाेरात सभागृहात घेण्यात आली. या युवा महोत्सवामध्ये क्लासिकल व्होकल सोलो, क्लासिकल इन्स्ट्रुमेंटल सोलो, लाइट व्होकल, वेस्टर्न व्होकल, ग्रुप साँग, फोक ऑर्केस्ट्रा या संगीतप्रकारांचा समावेश होता. नृत्यप्रकारांत शास्त्रीय आणि लोकनृत्य हे दोन प्रकार सादर झाले. याशिवाय वादविवाद, प्रश्नमंजूषा या स्पर्धा आहेत. नाट्यप्रकारांत एकांकिका, नाटुकले, मूकनाट्य, मिमिक्री हे प्रकारदेखील सादर झाले. 

या प्रकारांसह ललितकला प्रकारामध्ये ऑन स्पॉट पेंटिंग, कोलाज, पोस्टर मेकिंग, क्ले मॉडलिंग, कार्टुनिंग, रांगोळी, स्पॉट फोटोग्राफी, इन्स्टॉलेशन या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेच्या पुढील विभागीय फेऱ्या ऑक्टोबर रोजी अहमदनगर, ऑक्टोबर रोजी पुणे ग्रामीण आणि ऑक्टोबर रोजी पुणे शहर विभागात होतील. तसेच विद्यापीठामध्ये होणाऱ्या युवा महोत्सवाची अंतिम फेरी ही आणि १० ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे. त्यासाठी नाशिकमधून आज झालेल्या स्पर्धेतील विजेते प्रविष्ट होणार आहेत. 
बातम्या आणखी आहेत...