आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळीच्या पैशातून घालणार ‘दुष्काळ जखमां’वर फुंकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भीषणदुष्काळाची झळ सुसह्य हाेण्यासाठी शहरातील तरुणांनी होळी उत्सव सालाबादप्रमाणे धूमधडाक्यात साजरा करता ताे पैसा वेगवेगळ्या स्वरूपात दुष्काळग्रस्तांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला अाहे. यासाठी त्यांनी विविध सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले अाहेत.
भूषण काळे प्रसाद देशमुख यांनी अापल्या अाडगाव नाशिकराेड या रहिवासाच्या परिसरातील सार्वजनिक मंडळांशी चर्चा करून यंदा साजरा होळी करण्याचा निर्णय घेतानाच या उपक्रमात मंडळांनाही सहभागी करून घेण्याचे ठरवले आहे. सोशल मीडिया, मौखिक प्रसिद्धी, पत्रके यासारखी अनेक माध्यमे वापरून त्यांनी प्रबोधन सुरू केले आहे. वेगवेगळ्या परिसरातील तरुणांशी बोलून पैसा आणि पाणी वाया घालवून सण साजरे करण्याची विनंती केली जात आहे.
तरुणांच्या माध्यमातून प्रबोधन झाल्यास समवयस्क, समविचारी व्यक्ती एकत्र आणण्याचा मानस या तरुणांनी व्यक्त केला. शहरात असलेल्या सार्वजनिक मंडळांशी चर्चा करून हा निर्णय तडीस नेणार असून रंगपंचमीसाठीही पाणी वापरणार नाही, याची ग्वाही त्यांनी दिली आहे. मंडळांच्या होळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पैशातून पाणी किंवा अन्नधान्याची कमतरता असलेल्या भागात मदत पाठवली जाणार आहे.

यासाठी त्यांनी हुशारीने याेजना अाखली अाहे. एखाद्या महाविद्यालयामध्ये साधारण दहा तरी सार्वजनिक मंडळांचे प्रतिनिधी असतात. त्यामुळे गेल्या वर्षी जसे होळीत कापूर वापरण्याचे मेसेज फिरत होते, तसेच यंदा होळी साजरीच करू नका, असे मेसेज पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले. व्हायरल व्हायचेच असेल तर प्रबोधनाचे मेसेज का नकाे, अशी भूमिका या तरुणांनी व्यक्त केली. कोणत्याही प्रकारे संस्कृतीला किंवा परंपरेला धक्का पोहोचवता यंदा फक्त घरोघरी होळी साजरी करण्याचे आवाहन ही तरुण मंडळी करत आहेत.

पाणी पैशाची उधळपट्टी नकाेच...
^यावर्षी पाण्याची अभूतपूर्व टंचाई पाहून रंगपंचमी तर साजरी करणार नाहीच. होळीवर खर्च होणारा पैसा पाणी आणि अन्नधान्याची गरज असणाऱ्या बांधवांसाठी वापरावा, असे आवाहन परिसरात सुरू केले आहे. नाशिकरोडला बऱ्याच मंडळांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. तरुण मित्रांना पाण्याशिवाय रंगपंचमी आणि उधळपट्टीशिवाय होळी साजरी करण्याचे आवाहन करत आहोत. - प्रसाद देशमुख

दुष्काळी स्थितीत सेलिब्रेशन कशाला?
^यावर्षी आमच्या सार्वजनिक मंडळात होळी करायची नाही असा ठराव सर्वसहमतीने मंजूर केला. महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्याही मंडळांचा होळीचा पैसा सकारात्मकरित्या वापरता येईल, असे वाटले. दुष्काळी परिस्थितीत सेलिब्रेशन कशाला? लोकांचे प्रबोधन करून सार्वजनिक होळी साजरी करता पैसे दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वापरण्याचे आवाहन करणार आहोत. - भूषण काळे
बातम्या आणखी आहेत...