आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूरग्रस्तांना झळ, मात्र तरुणाईने दिले बळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवळाली कॅम्प - गोदावरीची उपनदी असलेल्या दारणा नदीला इगतपुरी नाशिक तालुक्यात झालेल्या पावसामुळे पूर आला. या पुरात नाणेगाव भगूर येथील पुलाच्या कठड्याचे लोखंडी पाइप वाहून गेले आहेत. यामुळे पुलावरून ये-जा करणे धोक्याचे झाले आहे.
या पुलावरून ग्रामीण भागातील विद्यार्थी, कामगारवर्ग विविध प्रकारच्या वाहनांची वर्दळ असते. रात्रीच्या वेळी अंधारात हे लोखंडी पाइप वाहून गेल्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना ये-जा करणे धोक्याचे होऊन पुलाचा अंदाज आल्याने अपघात घडण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे अशा पुलांची पाहणी करत संबंधित विभागाने हे संरक्षक कठडे पुन्हा सुरक्षित करून नागरिकांना होणारा धोका टाळावा, अशी मागणी नितीन शिंदे, ज्ञानेश्वर काळे, अण्णा कडभाने, प्रकाश बेरड, संजय आडके, अशोक शिंदे, चंद्रकांत आडके, अविनाश आडके आदींनी केली आहे.
पूर ओसरल्यानंतर गोदाकाठच्या घरांत सर्वत्र चिखलाचे साम्राज्य असून, पंचवटीही त्याला अपवाद नाही. महानगरपालिका प्रशासनाकडून या पूरग्रस्तांना अद्याप मदत मिळाली नसल्याने त्यांना दानशूरांकडून येणाऱ्या मदतीवर अवलंबून राहावे लागत आहे. परिसरातील लोकप्रतिनिधी, राजकीय नेत्यांकडून काही प्रमाणात मदत दिली जात आहे.

महापुरानंतर पंचवटी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. पूर ओसरल्यानंतर या पुरात आपला संसार गमावलेली अनेक कुटुंबे उजाडलेल्या घरांकडे परतले. घरातील सर्व अन्नधान्य पुरात वाहून गेल्याने अन्न शिजवण्यासाठी साधन उपलब्ध नसल्याने उपाशीपोटी ही कुटंुबे उजाड झालेल्या घरांतील साफसफाई करण्यात मग्न आहेत. या कुटंुबीयांना अद्याप शासकीय मदतीची अपेक्षा आहे. घरातील सर्व सदस्य चिखल साफ करण्याच्या कामात व्यस्त आहेत.
अशा परिस्थितीत दानशूरांकडून मिळालेले अन्न खाऊन दिवस काढावे लागत आहे. सर्वाधिक नुकसान पंचवटी परिसरातील वाघाडी, तपोवन, घारपुरे घाट, मखमलाबाद नाका, रामवाडी, गाडगे महाराज पुलावरील झोपडपट्टी, अमरधाम, तपोवन परिसरातील झोपडपट्टी, मंडलिक मळा, साईनगर अादी परिसरातील नागरिकांच्या समस्या कायम आहेत. प्रभाग क्रमांक च्या नगरसेविका सुनीता शिंदे यांनी पूरग्रस्त भागात मनपा अधिकाऱ्यांसह पाहणी केली. जेसीबी, अन्य साधनांनी साचलेले पाणी वाहते करण्यात आले. पूर आणि पावसाने रस्त्यावर पाल ठोकून राहत असलेले आणि झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना उपमहापौर गुरुमित बग्गा, नरेश पाटील यांनी पुरीभाजीचे पॅकेट वाटप केले. फुलेनगर परिसरातील कॅनॉललगत असलेल्या झोपडपट्टीत शेखर निकम यांच्या हस्ते गहू, तांदूळ वाटप करण्यात आले.
अाठवडाभरसुरू असलेला पाऊस अाणि गाेदावरीला अालेला पूर यामुळे गोदाकाठचे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. एकीकडे पूर बघत त्याला सेल्फीत बंदिस्त करण्यासाठी गर्दी उसळत असताना, दुसरीकडे पुरात असंख्य कुटुंबांची वाताहत झाली. गाेदाकाठच्या नागरिकांवर अालेल्या या संकटाची तीव्रता दूर करण्यासाठी अाणि त्यांच्या वेदनांवर फुंकर मारण्यासाठी शहरातील तरुणाईने पुढाकार घेतला. त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा हा अादर्श अनेकांसाठी अादर्शवत ठरला.

मित्रांशी गप्पाटप्पा करण्यासाठी फाेटाे शेअर करण्यासाठी साेशल मीडियाचा वापर माेठ्या प्रमाणावर हाेत अाहे. व्हाॅट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून ही मंडळी बराच काळ टाइमपासही करताना दिसते. परंतु, शहरावर संकट येते तेव्हा मात्र हेच व्हाॅट्सअॅप ग्रुप्स कार्यरत हाेऊन मदतीसाठी रस्त्यावर उतरतात. हा अनुभव पूरपरिस्थितीत नाशिककरांनी घेतला. शहरातील तरुणांच्या वेगवेगळ्या गटांनी मदतकार्यात हिरिरीने सहभाग घेऊन पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला.

सुनीतापाटील यांच्या कुटुंबीयांना ‘उधाण’चा अाधार : नाशिकच्यापंचवटी स्मशानभूमीत दहा वर्षांपासून अंत्यसंस्कारासाठी मदत करणाऱ्या सुनीता पाटील आणि हिरवे कुटुंबीयांना उधाण युवा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष जगदीश बोडके यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. ग्रुपच्या सदस्यांना आवाहन करत एकत्र केले आणि दाेन्ही कुटुंबीयांना ग्रुपच्या वतीने मदत करण्यात अाली. या उपक्रमात नीलेश सरोदे, सचिन गरुड, विश्वनाथ उगले, विक्रांत कोल्हे, भूषण गायकवाड, रोहन सरोदे, मोनिश पारेख, विकी हरक, सुधाकर टाव्हरे प्रवीण विश्वकर्मा आदींनी सहभाग घेतला होता.

‘एसकेडी’चाहीपुढाकार : अभियंते,डाॅक्टर्स, बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार, उद्याेजक पत्रकार या सर्वांनी एकत्र येऊन तयार केलेल्या एसकेडी ग्रुपच्या माध्यमातून पंचवटी अाणि सायखेडा परिसरात मदतकार्य करण्यात अाले. या ग्रुपतर्फे पाणी बॉटल, बिस्किट्स, खाद्यपदार्थ यांचा पुरवठा करण्यात अाला.

वाहतूक हाेतेय जिकिरीची
देवळालीहून नवेगावकडे जाणाऱ्या केंद्रीय विद्यालयाच्या रस्त्यावर असलेल्या मोरीखाली मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून, यामुळे नाणेगावसह ग्रामीण भागाला जोडणाऱ्या या रस्त्यावरून वाहतूक करणे जिकिरीचे झाले आहे. तरी संबंधित विभागाने लक्ष देऊन समस्या मार्गी लावणे गरजेचे आहे, अशी मागणीही वाहतूकदारांकडून होत आहे.

‘पूरग्रस्तांना तातडीने मदत द्या’
‘पंचवटी साउंड अॅण्ड लाइट्स’ने केले महापुराप्रसंगी बचावकार्य
पंचवटी साउंड अँड लाइट्स ग्रुपतर्फे पुरात बचावकार्य करण्यात अाले. पुरात उभे राहून रहिवाशांना या तरुणांनी सुरक्षित स्थळी हलविले. या उपक्रमात हितेश पटेल, जितू भट्टी, डीजे नील, सूरज, अाशिष, अाकाश, साैरभ, संताेष, किशाेर, अरुण, केतन, लाला, मल्हारी, पिंटू सेठ, जितू उपाध्याय अादींनी सहभाग घेतला.

बिल्डर्स असाेसिएशन अाॅफ इंडियाच्या वतीने धान्याचे वाटप
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या नाशिक शाखेतर्फे तांदूळ आणि डाळ घरोघर वाटप करण्यात आली. या उपक्रमात रामेश्वर मालाणी, दीपक धारराव, महेश भामरे, भूपेंद्र गोगी, राजेंद्र मुथा, राहुल सूर्यवंशी आदी पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

पंचवटीमध्ये विशेष स्वच्छता मोहीम
^पंचवटी परिसरात विशेषत: पूरबाधित भागात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना स्वच्छतेच्या सूचना केल्या आहेत. या मोहिमेचे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मदतीसाठी पाठपुरावा करणार आहे. -रुची कुंभारकर, सभापती, पंचवटी प्रभाग
बातम्या आणखी आहेत...