आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकराेडला तरुणाची डाेक्यात दगड घालून हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - दसक येथे सायट्रिक इंडिया कंपनीच्या मोकळ्या जागेत बुधवारी (दि. ८) पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी एका ४० वर्षीय तरुणाची हत्या केली. 

नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पप्पू यादव पाटील (रा. विठ्ठल मंदिराशेजारी, लोखंडे मळा) याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळला. त्याच्या डोक्यात दगड घालण्यात आला होता. पप्पू व्यसनाच्या आहारी गेला होता. 

त्याच्या वडिलांना अर्धांगवायूचा त्रास असून, तो घरात भांडणे करीत असे. त्याच्या त्रासाला कंटाळून पत्नीही त्याला सोडून गेली असल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती कोणताही धागा सापडला नव्हता. याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...