आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातपूरला युवकाचा तलवारीने खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सातपूरच्या शिवाजीनगरमध्ये मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून निरंजन साळुंखे (28) या युवकाचा तलवारीने भोसकून खून करण्यात आला. प्रशांत पवार यांच्यावर पूर्ववैमनस्यातून निगळ कॉम्प्लेक्सजवळ इनोव्हातून आलेल्या काही युवकांनी हल्ला केला. पवार यांनी भाऊ संजयला तातडीने फोनवरून मारहाण होत असल्याची माहिती दिली. त्यानंतर संजय हा विजय विश्वकर्मा व साळुंखे या मित्रांसह तेथे दाखल झाला. त्यानंतर विरोधी गटाकडून झालेल्या हाणामारीत खाली पडलेल्या संजयला उचलण्यासाठी साळुंखे खाली वाकला असता त्याच्यावर विरोधी गटातील काहींनी तलवार व चाकूने वार केले. रात्री बारा वाजता साळुंखेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


सातपूरला युवकाचा तलवारीने खून
सातपूरच्या ज्योती स्ट्रक्चर कंपनीजवळ साळुंखेची चहाची टपरी होती. त्याच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. संजय पवार, विश्वकर्मा हे जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.