आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘युवा स्पंदन’मध्ये नृत्याची धमाल, नृत्य स्पर्धेत प्रेक्षकही थिरकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मू.जे.कनिष्ठमहाविद्यालयाचे स्नेहसंमेलन ‘युवा स्पंदन’चा दुसरा दिवस म्हणजेच शनिवार विविध ललित कला सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला. सकाळी रंगमंचाची पूजा करून कार्यक्रमांना सुरुवात झाली.

या वेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एस.सी.चौधरी, स्नेहसंमेलनप्रमुख प्रा.पी.डी.भोळे, प्रा.एस.ओ.उभाळे, समन्वयक प्रा.आर.बी.ठाकरे, प्रा.पी.बी.चौधरी अादी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात अंताक्षरी स्पर्धेने झाली. या स्पर्धेत पाच संघांचा समावेश होता. या संघांना सूर, ताल, लय, नाद आणि धून अशी नावे देण्यात अाली होती एका संघात तीन स्पर्धकांचा समावेश होता. अंताक्षरी स्पर्धेत चार फेऱ्या झाल्या. ताल लय या संघांमध्ये टाय झाली. एक धून ऐकवून अचूक गाणे ओळखणाऱ्या ‘ताल’ संघाला विजयी घोषित करण्यात आले.
अनुष्का ठाकरे, राजेश्वरी ठाकूर हर्षल जोशी यांचा ‘ताल’ संघात समावेश होता. स्पर्धेचे सूत्रसंचालन मानसी माळीचकर युक्ता पाटील यांनी केले, तर परीक्षक म्हणून प्रा.वाय.ए.सैंदाणे सुरेखा पालवे यांनी काम पाहिले. शीतल काळे यांनी आभार मानले.

गायनस्पर्धेत १९ जणांचा सहभाग
यानंतरझालेल्या विविध क्लासिकल चित्रपट गीतगायन स्पर्धेत एकूण १९ स्पर्धकांनी भाग घेतला. भाग्यश्री पेंढारकर हिने गायलेले ‘उमरावजान’ चित्रपटातील ‘दिल चीज है क्या...’ या गाण्याने सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तसेच कल्याणी चौधरीने गायलेले अहिराणी गाणे "भाऊ मना सम्राट’ या गाण्यावर उपस्थित प्रेक्षकांनी ठेका धरला. देव काळे याचे गिटारवादन या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. सुप्रिया प्रभा हिने ‘लग जा गले’ हे गीत गायले. पर्यवेक्षक म्हणून जळगाव आकाशवाणी केंद्राचे सतीश शर्मा गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या डॉ.संगीता म्हसकर यांनी काम पहिले. या वेळी मू.जे.महाविद्यालयाचे विद्यार्थी चित्रपट कलावंत मनोज जाधव यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.

नृत्य स्पर्धेत उपस्थित विद्यार्थ्यांनीही धमाल केली. सोलो समूह नृत्यात एकूण २२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यात शिवम नारखेडे याने रिमिक्स गाण्यावर सादर केलेल्या नृत्यावर प्रेक्षकांनीही मनसाेक्त नृत्याचा अानंद लुटला. त्याने नृत्यादरम्यान सादर केलेले स्टंट्स नेत्रदीपक कौतुकास्पद होते. कल्याणी चौधरीने सादर केलेल्या लावणीवरही प्रेक्षकांनी ठेका धरला.

सध्या चर्चेत असलेल्या ‘शांताबाई...’ या गाण्यावर नृत्य करताना तरुणी. ‘शांताबाई...’ गाण्यावर सादरीकरण सुरू झाल्यानंतर कार्यक्रम पाहणाऱ्या तरुणींनाही नाचण्याचा माेह अावरता अाला नाही. त्यांनीही या गाण्यावर मनसोक्त नृत्य केले.
‘शांताबाई... शांताबाई...’ गाण्यावर तरुणाई थिरकली
पुढील स्‍लाइडवर पाहा ‘युवा स्पंदन’मध्ये नृत्याची धमाल करतांना युवकांचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...