आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मित्रांच्या छळाला कंटाळून मुलाने केली अात्महत्या, युवकाच्या अाईची तक्रार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जुन्या नाशकातील साेमवार पेठेत राहणाऱ्या एका युवकाने अाठवडाभरापूर्वी घरात गळफास घेऊन अात्महत्या केल्याच्या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले असून युवकाच्या अाईने त्याच्या चार मित्रांच्या छळामुळेच त्याने जीवन संपविल्याची तक्रार पाेलिसांत केली अाहे. भद्रकाली पाेलिसांनी चाैघा युवकांविरुद्ध अात्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला अाहे.

 

गणेश ऊर्फ सिद्धार्थ जनार्दन पवार (२५) याने १५ नोव्हेंबरला राहत्या घरात अात्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेस सात दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर गणेशची अाई मंगल पवार यांनी भद्रकाली पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीनुसार, गणेशचे मित्र संशयित प्रवीण सावंत, संदीप पाटील, दीपक आणि सचिन पाटील त्याला वारंवार अपमानास्पद वागणूक देत. कुठेही भेटला की त्याला उलटसुलट टाेमणे मारायचे, काही कामधंदा करीत नाही का, असे त्याला टाेचून बाेलत असल्याने ताे वैफल्यग्रस्त झाला हाेता. त्याच्या सांगण्यानुसार संशयितांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला हाेता. तरीही त्यांनी हा प्रकार सुरूच ठेवल्यानेच त्याने अात्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले अाहे. सहायक पोलिस निरीक्षक श्रीमती एम. पी. लोखंडे तपास करीत अाहेत.

बातम्या आणखी आहेत...