आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छळाला कंटाळून तरुणाचा ग्रामस्थांसमोरच गळफास; वांजोळे येथील घटना, काही काळ तणाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इगतपुरी - वांजोळे (ता. इगतपुरी) येथील एका तरुणाला गावातीलच काही संशयित व्यक्तींनी शारीरिक मानसिक केलेला छळ असह्य झाल्याने त्याने सर्व गावकऱ्यांसमक्ष चौकात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली.
 
दरम्यान, शारीरिक आणि मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सर्व संशयितांना अटक करावी अशी मागणी करत तरुणाच्या नातलगांनी जोपर्यंत सर्व संशयितांना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्याचा आणि अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर नातलगांनी मृतदेहावर रविवारी दुपारनंतर अंत्यसंस्कार केले. 
 
विजय दत्तू पालवे (वय २९) याने गावातील एका मुलीला फूस लावून मदत केल्याचा संशय काही व्यक्तींचा होता. यामुळे गावातील काही मंडळी त्याचा सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ करून मारहाण करत होते. या छळाला कंटाळून शनिवारी संध्याकाळच्या सुमारास त्याने समाजमंदिरासमोर असणाऱ्या झाडाला सर्वांसमक्ष गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान याबाबत विजय पालवे याच्या नातलगांनी दिलेल्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी नऊ जणांना पोलिसांनी तत्काळ अटक केली. मात्र, उर्वरित दोन फरार संशयितांना अटक करावी अशी मागणी मृतांच्या नातलगांनी लावून धरीत जोपर्यंत फरार दोघांना अटक करत नाही तोपर्यँत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि अंत्यसंस्कार करणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत पोलिस ठाण्यासमोर चार तास ठिय्या मांडला.
 
अखेर घोटी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज भालेराव यांनी संतप्त नातलगांची समजूत घालत मध्यस्थी केली. त्यानंतर मृतदेह नातलगाच्या ताब्यात देऊन पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी वांजोळे गावात कमांडो पथकासह मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याबाबत घोटी पोलिसांनी दत्तू रामभाऊ बलय्या, कल्पना दत्तू बलय्या, संदीप दत्तू बलय्या, काळू रामभाऊ बलय्या, शोभा काळू बलय्या, सागर काळू बलय्या, चेतन काळू बलय्या, राहुल काळू बलय्या, वाळू रामभाऊ बलय्या, शारदा सुनील बलय्या ताई वाळू बलय्या या संशयितांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील काळू सागर हे बापलेक फरार आहेत. दरम्यान, या दोन्ही फरार संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी स्थानिक गुन्हा शाखेची मदत घेतली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मिलिंद नवगिरे, संदीप शिंदे आदी करीत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...