आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या सभेत भरपूर गाजरे मिळतील, युवासेनेचे प्रमुख अादित्य ठाकरेंचा टाेला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पवननगर येथील अादित्य ठाकरे यांच्या सभेला नागरिकांची झालेली गर्दी. - Divya Marathi
पवननगर येथील अादित्य ठाकरे यांच्या सभेला नागरिकांची झालेली गर्दी.
नाशिक - येत्या शनिवारी नाशिकमध्ये हाेणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेच्या दिवशी गाजरे खरेदी करू नका; कारण या सभेत नाशिककरांना असंख्य अाश्वासनांची गाजरे मिळणार अाहेत. किंबहुना, या भाजप सरकारने अन्य काही नाही, पण गाजर शेतीला मात्र चांगले प्राेत्साहन दिले असल्याचा जाेरदार टाेला युवा सेनेचे प्रमुख अादित्य ठाकरे यांनी पवननगर येथे झालेल्या प्रचार सभेत लगावला. 
 
नाेटबंदीचा निर्णय घेऊन देशातील तेरा लाख तरुणांचा राेजगार हिरावणाऱ्या, त्र्यंबकच्या पुराेहितांवर छापे टाकणाऱ्या, महाराष्ट्रातून विदर्भ अाणि मुंबई ताेडायला निघालेल्या भाजपला मतदानातून जागा दाखवा, नाशिकच्या देवभूमीत भाजपरूपी पाप येऊ देऊ नका, महापालिकेला भाजपरूपी कीड लागू देऊ नका, असे अावाहनही त्यांनी केले. 
 
नवीन नाेटांप्रमाणेच भाजपच्या जाहीरनाम्यातील अाश्वासनांचा रंगही पुसला जाणारा अाहे; त्यामुळे त्यांच्या थापांना भुलून जाऊ नका, असे सांगत ... गाजरे मुख्यमंत्र्यांच्या सभेत मिळतील अादित्यठाकरे पुढे म्हणाले की, नाशिकच्या भंगार बाजारात भाजपची अाश्वासने काही दिवसात जातील. नाेटाबंदीमुळे दहशतवादी हल्ले थांबतील असे सांगितले गेले. प्रत्यक्षात तसे काही झालेच नाही. मुंबईत मेट्राेच्या नावाने हजाराे व्यावसायिकांना दुकानांवर बुलडाेझर फिरवायला ही मंडळी निघाली हाेती. पण, शिवसेनेने हा डाव माेडून काढला. गुंड, बलात्काऱ्यांना साथ देणाऱ्या भाजपच्या थापांना जनता कंटाळली अाहे. दुसरीकडे, संभाजीनगर अर्थात अाैरंगाबाद येथे अाम्ही सत्ता अाल्यानंतर दीड वर्षातच वचननाम्याची पूर्तता करून दाखवली. अाम्हाला जे मान्य नव्हते, ते करायला भाजप लावत हाेते अाणि तेच युती तुटण्याचे प्रमुख कारण हाेते. भूसंपादन कायदाही त्यातीलच एक भाग हाेता. त्यामुळे अाता एकटे लढायचे अाणि एकटे जिंकायचे अाहे, असेही ठाकरे यांनी नमूद केले. पारदर्शीपणाचे भांडवल करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे बाेलणे अाणि विचार हे सर्वाधिक पारदर्शक अाहे, असे शिवसेनेचे सचिव अादेश बांदेकर यांनी सांगितले. यावेळी खासदार हेमंत गाेडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बाेरस्ते, नगरसेवक सुधाकर बडगुजर यांची भाषणे झाली. 
 
 
अादित्य ठाकरेंची वचननाम्यातील बाह्यवचने... 
- पेलिकन पार्कचा प्रश्न सहा महिन्यांत साेडवून तेथे थीम पार्क विकसित करू. 
- महापालिकेच्या १३५ शाळांमध्ये मुंबईच्या धर्तीवर व्हर्च्युअल क्लासरूम बनविणार. 
- अाठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे दप्तराचे अाेझे कमी करण्यासाठी टॅब देणार. 
- शाळांमध्ये मुलींसाठी सॅनिटरी वेंडिंग मशिन. 
- जेनेरिक अाैषध केंद्रांची निर्मिती. 
- भूमिगत विद्युत तारांची व्यवस्था करणार. 
 
माेबाइलचाेरांनी साधली पर्वणी 
निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय कार्यकर्त्यांची जशी चांदी हाेत अाहे, त्याचप्रमाणे माेबाइलचाेरही निवडणुकीचा पुरेपूर फायदा घेत असल्याची गंभीर बाब पवननगर येथे झालेल्या शिवसेनेच्या सभेतून पुढे अाली. या सभेत अाठ-नऊ लाेकांचे माेबाइल चाेरीला गेले. त्यात काही माध्यम प्रतिनिधींचाही समावेश अाहे. 
 
एबी फाॅर्मचा गाेंधळ शिवसेनेच्या हवेमुळे... 
शिवसेनेत एबी फाॅर्मवरून झालेल्या गाेंधळाबाबत बाेलताना ‘हवा असते तिकडेच जाण्यासाठी गर्दी हाेते. त्यातून अशा घटना घडू शकतात.’ असे स्पष्टीकरण ठाकरे यांनी दिले. 
 
राज ठाकरेंनाही लगावला टाेला 
राज ठाकरे यांना टाेला लगावताना अादित्य ठाकरे म्हणाले की, नाशिकमधील उद्याने, चाैक हे फक्त हाेर्डिंगवरच दिसतात. प्रत्यक्षात तर तसे काही दिसत नाही. त्यामुळे सगळ्यांना खरे काय ते ठाऊक अाहे. नाे उल्लू बनाविंग..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...