आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: कॉक्‌टेल म्युझिक अन‌् बेधुंद तरुणाई, एन्जॉयेबल नाशिकचा \'सुला फेस्‍ट\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - खुले आकाश... लखलखते तारे आणि हिरवळीवरील रंगीबेरंगी लाइट्स... मनाला धुंद करणारे वेस्टर्न म्युझिक आणि त्यावर थिरकणारी बेधुंद तरुणाई... अशा जल्लोषात देशाची वाइन राजधानी असलेल्या नाशिकमध्ये शनिवारी(ता.सात) आणि रविवारी(ता.आठ) आठव्या सुला फेस्टीव्हलचे आयोजन करण्‍यात आले होते. या फेस्टचा देशी आणि परदेशी वाइनप्रेमींनी मनमुराद आनंद घेतला.

यामुळे स्थानिक टुरिझम आणि हॉटेलिंगच्या आर्थिक उलाढालीत वाढ झाली. यानिमित्ताने नाशिकच्या वाइनची कीर्ती जगभर पोहोचण्यास मदत होणार आहे. जानेवारीपासून टेबल व वाइन ग्रेप्स हार्वेस्टिंग, क्रशिंगचा हंगाम सुरू होतो. वाइन क्रशिंग जानेवारी ते एप्रिल हे चार महिने सुरू असतो. भारतीय वाइन जगातील बहुतांश देशांमध्ये प्रसिद्ध आहे.

हा सुवर्णमध्य साधून सुला विनियार्ड दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाइन फेस्टचे आयोजन करते. यावर्षी शनिवारी पहिल्याच दिवशी इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, अमेरिका, हॉलंड, इटली या देशांतील सुमारे दोन हजार परदेशी पर्यटकांसह दिल्ली, गुरगाव, बंगलोर, इंदोर, सुरत, बडोदा, गोवा, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथील पर्यटकांनी हजेरी लावत या फेस्टचा आनंद लुटला. तर, परदेशी पर्यटकांनी टेंटचा अनुभव घेतला.

पुढे पाहा सुला फेस्टीव्हलमध्‍ये इन्जॉन करत असलेली तरुणाई...