आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Youths To Contribute In Development Via Indovasion Nasik Circle

‘इंडोवेशन नाशिक सर्कल’द्वारे तरुणाई टाकणार विकासात भर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- नाशिकच्या विविध क्षेत्रांतील प्रश्न सोडविण्यासाठी नाशिक व अमेरिकेतील तंत्रज्ञांनी एकत्र येऊन इंडोवेशन नाशिक सर्कलची स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालयातील मुलांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. अमेरिकेतील मेसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे सहाय्यक प्राध्यापक व मूळचे नाशिककर डॉ. रमेश रासकर यांच्या सहकार्याने व ‘खांडबहाले डॉट कॉम’चे निर्माते सुनील खांडबहाले यांच्या पुढाकाराने इंडोवेशन नाशिक सर्कलची निर्मिती केली आहे. जानेवारी 2014 अखेरीस या उपक्रमाचा प्रारंभ होणार आहे.

तरुणांनी उद्योग-व्यवसायाकडे वळावे, हा यामागचा हेतू आहे. त्यासाठी पन्नासपेक्षा अधिक पेटंट नावावर असलेले डॉ. रासकर स्वत: ‘एमआटी’च्या माध्यमातून मदत करणार आहेत.

‘खांडबहाले डॉट कॉम’च्या मध्यवर्ती कार्यालयात यासंबंधीची बैठक झाली. या उपक्रमात सहभागी होणारे ‘एमकेसीएल’चे नाशिक विभागाचे प्रमुख सुभाष पाटील, मविप्रच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत पट्टीवार, तसेच ‘आयएमआरटी’ महाविद्यालयाचे डॉ. सचिन पाचोरकर, प्रकाश रासकर, अँण्ड्रॉइड गेम डेव्हलपर गुणवंत बत्तासे, आरोग्य व फार्मास्युटिकल क्षेत्रात काम करणारे परिक्षित बाविस्कर, जयंत भालेराव, अजिंक्य पाटील आदी उपस्थित होते.