आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमधे आज उस्ताद उस्ताद झाकीर हुसेन यांच्‍या तबलावादनाचा कार्यक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- त्यांनी तबल्यावर एखादी थाप मारावी आणि रसिकांनी त्याच्या रूपगंधात भान विसरून ‘वाह उस्ताद’ म्हणावे.. ही अनुभूती रसिकांना शुक्रवारी (दि. 7) सायंकाळी 6 वाजता केटीएचएम कॉलेजच्या बोटक्लबवर अनुभवायला मिळणार आहे. अर्थातच ‘वाह उस्ताद’ कार्यक्रमाद्वारे तालनवाज उस्ताद झाकीर हुसेन आपल्या तबला वादनाने सूर्यास्ताला अघ्र्य वाहणार आहेत. पुण्यातील व्हायोलिन अकादमी, लिसनर्स ग्रुप ऑफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजकत्व ‘दिव्य मराठी’कडे आहे.

अशी रंगणार मैफल
‘वाह उस्ताद’ कार्यक्रमातआजच्या पिढीतील लोकप्रिय गायक राशीद खॉँ यांना संवादिनीवर अजय जोगळेकर, तर तबल्यावर पंडित विजय घाटे साथसंगत करणार आहेत.

उत्तरार्धात तबला या वाद्याला सार्‍या विश्वामध्ये लोकप्रियता मिळवून देणारे आणि आपल्या बोटांच्या जादूने दुनियेला वेड लावणारे उस्ताद झाकीर हुसेन हे तबला वादनाची मेजवानी देणार आहेत. त्यांना साथ
सारंगीवादक उस्ताद दिलशाद खॉँ हे देतील.

कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन लिसनर्सचे अँड. नितीन ठाकरे, प्रदीप सराफ, योगेश हिरे, राजस उपाध्ये, प्रताप सराफ, प्रकाश पगारे यांनी केले आहे. कार्यक्रमासाठी रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, प्रवेशिकांसाठी 8975003213 किंवा 8975003222 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

येथे मिळतील प्रवेशिका
जहागीरदार बेकर्स, कॅनडा कॉर्नर - 8805014324, एम.जी.रोड- 8888882148 बिटको पॉइंट नाशिकरोड-2453733, महात्मानगर तसेच कालिदास कलामंदिर, शालिमार, पु. ना. गाडगीळ अँण्ड सन्स, कॉलेजरोड या ठिकाणी उपलब्ध होतील.