आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Zakkr Husan And Rashid Kha's Music Programme Issue At Nashik

नाशिकमध्ये रंगणार दोन उस्तादांची मैफल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- आपल्या बोटांच्या जादूने दुनियेला वेड लावणारे उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबला वादनाचा आस्वाद नाशिककरांना 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता केटीएचएम महाविद्यालयाच्या बोट क्लब येथे घेता येणार आहे. या ‘वाह उस्ताद’ मैफलीत लोकप्रिय गायक राशीद खॉँ हेदेखील आपल्या रामपूर घराण्याची गायकी रसिकांसमोर सादर करणार आहेत. पुण्यातील व्हायोलिन अकादमी व नाशकातील लिसनर्स ग्रुप ऑफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे.

कार्यक्रमाविषयी पत्रकार परिषदेत माहिती देताना व्हायोलिन अकादमीचे संचालक अतुलकुमार उपाध्ये म्हणाले की, भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसाराचे कार्य व्हायोलिन अकादमी व लिसनर्स ग्रुप ऑफ नाशिक करीत आहे. 7 फेब्रुवारीच्या मैफलीमध्ये गायक राशीद खॉँ यांना संवादिनीवर अजय जोगळेकर, तर तबल्यावर पं. विजय घाटे साथ करतील. उत्तरार्धात उस्ताद झाकीर हुसेन हे तबला वादन सादर करतील. त्यांना साथ उस्ताद दिलशाद खा (सारंगी) हे देतील. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन उपाध्ये यांच्यासह लिसनर्सचे अँड. नितीन ठाकरे, प्रदीप सराफ, योगेश हिरे, राजस उपाध्ये, प्रताप सराफ, प्रकाश पगारे यांनी केले आहे.