आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झीनत म्हणते, सुंदर दिसण्यासाठी प्रेम करा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ‘इफ यू वॉन्ट टू बी ब्युटीफुल .. आय वुईल शुअरली से यु मस्ट फॉल इन लव्ह’.. चेह-यावर खट्याळसं हसू आणि मादक नजरेचा कटाक्ष टाकत ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी आपल्या सौंदर्याचं रहस्य अभिव्यक्त केलं. नुकत्याच नाशिकमध्ये आल्या असताना त्यांनी ‘दिव्य मराठी’शी संवाद साधला.
70-80 च्या दशकात आपल्या सौंदर्य व दिलखेचक अदाकारीने चाहत्यांना वेड लावणा-या झीनत अमान चिरतारुण्याचा वरच घेऊन आल्या असल्यागत वाटत होते. सुंदर दिसावसं वाटणा-या प्रत्येकाने कोणाच्या तरी प्रेमात पडावं हे तर खरं आहेच, पण प्रेम ही संकल्पनाच इतकी सुंदर आहे की ती व्यक्तिपरत्वे बदलू शकते.. कोणी जीवनावर भरभरून प्रेम करेल तर कोणी आणखी कशावर.. पण प्रेमात पडलेला प्रत्येक जण ख-या अर्थाने सुंदर दिसतो, असे त्यांनी आवर्जून सांगितलं.
झीनतची पडद्यावरील अदाकारीदेखील तितकीच रसभरीत... त्यामुळेच फिल्मी दुनियेचा एक मोठा प्रवास अनुभवलेल्या झीनत यांनी या काळात झालेल्या बदलांवर दृष्टिक्षेप टाकला आणि उत्तरल्या, आमच्या काळात केवळ वृत्तपत्रं आणि फिल्मी गॉसिप करणा-या मासिकांचेच राज्य होते. त्यामुळे या माध्यमांनी आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवलं पण त्यानंतरच्या काळात मात्र तंत्रज्ञानाने आमूलाग्र क्रांती घडवली आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया तर आज घराघरात जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे खूप बदल झाला आहे. आताचे सर्व चित्रपट तांत्रिकदृष्ट्या खूपच प्रगत आहेत असे दिसते. केबल, इंटरनेट, फेसबुकमुळे सारं जगच तुमच्या हातात आलं आहे. आताचे काही चित्रपट म्हणजे ओल्ड वाइन इन न्यू बॉटल असल्याची प्रतिक्रिया झीनत यांनी दिली.
‘दम मारो दम’ने दिली मला ओळख- ‘हरे रामा हरे कृष्णा’तील नशेच्या आहारी गेलेल्या मुलीची भूमिका असल्याने लोकांनी मला पहिल्यांदा पडद्यावर पाहिलं आणि कौतुक केलं ते सौंदर्याचं नव्हे तर माझ्या अभिनय कौशल्याचं.. याचा मला अभिमान वाटतो. डॉन चित्रपटातील ‘खई के पान’ या गाण्याचं चित्रीकरण सगळ्यात शेवटी ठरलं होतं. गाण्याचे दिग्दर्शक परफेक्शनिस्ट असल्याने अमिताभ आणि मला टेक वर टेक द्यावे लागले होते. हे मला आजही चांगलंच लक्षात आहे. पण मजा आली होती.
मनोरंजन असेल तर गैर काय?- मी डॉन 2 अजूनही पाहिलाच नाही. त्यामुळे प्रियंका चोप्राने केलेली रोमाची भूमिका माहीतच नाही. चित्रपटाचं काम मनोरंजन हेच आहे. त्यामुळे रिमेक ही जर मनोरंजन करत असतील तर त्यात गैर काय ?
‘काकाजी’ की यादे...- राजेश खन्नांच्याबरोबर मी आशिक हू बहारोंका, छैला बाबू, जानवर आणि जाना लेट्स फॉल इन लव्ह हे चित्रपट केले. आशिक हू बहारोंकाचं शूट संपवून आम्ही युरोपमधून आलो तेव्हा पंतप्रधानांसमवेत भेट ठरली होती. त्यावेळी काकाजींना पाहताच लोकांनी गर्दी केली. तसंच ‘छैय्या छैय्या’पेक्षा हे गाणं रेल्वेच्या टपावर मी काकाजींनी ‘हम दोनो दो प्रेमी’ हे पहिलं रेल्वेच्या टपावरचं गाणं.. याची आठवणही त्यांनी दिली.