आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आहारात झीरो ऑइल, तर हृदय निरोगी राहील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भारतात दहा कोटी लोकांना हृदयाच्या विकारग्रस्त, तर दरवर्षी लाखो लोकांचा हृदयविकाराने मृत्यू होतो. मेडिकल सायन्स चुकीच्या दिशेने जात असल्याचे वास्तव उलगडून सांगतानाच हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बिमल छाजेड यांनी निरोगी हृदयासाठी सोपा मंत्र दिला. मांसाहर बंद करून ऑइल फ्री आहार घेतल्यास कॉलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराइड योग्य प्रमाणात राहील. त्यामुळे हृदयातून होणारा रक्त पुरवठाही सुरळीत होऊन हृदय विकाराचा धोका टळेल. त्यासाठी मानसिकता बदलून झीरो ऑइल आहाराची सवय लावण्याचे आवाहन छाजेड यांनी नाशिककरांना केले.

दैनिक भास्कर नॉलेज सिरीजअंतर्गत ‘दिव्य मराठी’तर्फे शंकराचार्य संकुल सभागृहात ‘जाणून घ्या निरोगी हृदयाची स्पंदने’ कार्यक्रमात डॉ. छाजेड बोलत होते. याप्रसंगी ‘दिव्य मराठी’चे नाशिक युनिटचे जनरल मॅनेजर मदनसिंह परदेशी, निवासी संपादक जयप्रकाश पवार, डेप्युटी एडिटर अभिजित कुलकर्णी, आडगावकर सराफचे संचालक महेश अाडगावकर आदी उपस्थित होते. हृदयात तयार होणारे ब्लॉकेज, हृदयविकाराचा झटका का उद‌्भवताे याची शास्त्रीय दृष्टिकोनातून डॉ. छाजेड यांनी माहिती दिली. हृदयातून रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांत चुकीच्या आहारामुळे ब्लॉक तयार होतात. हळूहळू कॉलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराइड वाढत जाऊन ब्लॉकेजेस मोठे होतात. त्यामुळे रक्त पुरवठ्यास अडथळा आल्यास हृदय विकाराच्या झटक्याचा धोका जास्त असतो, असेही डाॅ. छाजेड यांनी याप्रसंगी उपस्थितांना सांगितले.

झीरोऑइलच्या हजार रेसिपी.. : हृदयिवकाराचा आजार टाळण्यासाठी कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराइड यांचे शरीरातील प्रमाण योग्य संतुलित ठेवावे. त्यासाठी आहारातून मांसाहार ऑइलचा वापर पूर्णत: बंद करून झीरो ऑइलचा वापर करून जेवण घ्यायला हवे. त्यासाठी डॉ. छाजेड यांनी स्वत: तयार केलेल्या एक हजार रेसिपीची माहिती त्यांनी इंटरनेटवर उपलब्ध करून दिली आहे.

हा अत्यंत स्तुत्य उपक्रम
हृदयविकारासंबंधी जागृती प्रबोधनासाठी ‘दिव्य मराठी’चा उपक्रम महत्त्वाचा आहे. हृदयाच्या काळजीबाबत अत्यंत सोप्या टिप्स मिळाल्याने त्याचा सर्वांनाच फायदा होईल. हृदय विकाराबाबतचे गैरसमज दूर होण्यास मदत झाली. महेश आडगावकर, संचालक,आडगावकर सराफ

निरोगी हृदयासाठी हे करा
मांसाहाराने कॉलेस्ट्रॉल वाढते. झीरो ऑइल अर्थात तेल पूर्णपणे बंद करा. त्याऐवजी पाण्याचा वापर करून भाजी बनवा. ड्रायफ्रुट्स खाणेही हृदयासाठी हानिकारक आहे. तंबाखू, सिगारेट, दारूचे व्यसन बंद करा. वजन वाढू देता त्यावर नियंत्रण ठेवा. मनात भीती बाळगता मानसिकता बदलून आनंदी जीवन जगा. रक्तदाब साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात बदल करा.

सिटी अँजिओग्राफी रुग्णांसाठी आधार
हृदयाचेआजार जडलेल्यांना छातीत डावीकडे दुखते तेव्हा हृदय विकाराचे धोके संभवतात. हृदय विकाराबाबत तपासणी करायला जातात, तेव्हा डॉक्टर अँजिओग्राफीचा सल्ला देतात. परंतु, अशा स्थितीत सिटी अँजिओग्राफी करून हृदय विकाराची तपासणी करावी. त्यासाठी मुंबईसह मोठ्या शहरांत नामांकित हॉस्पिटल्समध्ये सिटी अँजिओग्राफीची सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठीचा खर्च ही ते हजार रुपयांपर्यंत येतो. या तपासणीत केवळ १० मिनिटांत सिटी स्कॅनरद्वारे हृदयातील ब्लॉकेजेसी माहिती मिळते. त्यासाठीची सर्व माहिती www.saaolheartcenter.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.