आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि.प, पंचायत समितीमध्‍ये शिवसेनेची बाजी, राष्ट्र‌वादीची सद्दी संपली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तीन पंचवार्षिकपासून नाशिक जिल्हा परिषदेवर असलेली राष्ट्रवादीची सद्दी या वेळी संपुष्टात आली असून, शिवसेनेने गेल्यावेळपेक्षा ७ जागा वाढवत २५ जागांसह विजय मिळवत सरशी केली आहे. राष्ट्रवादीने गतवेळच्या २७ जागांपैकी ९ जागा गमावल्या असून, त्यांना १८ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
 
भाजपच्या जागांतही तब्बल ११ ने वाढ झाली असून, त्यांचा आकडा १५ वर गेला आहे. काँग्रेसला ८  जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेना-भाजप एकत्र आल्यास ३७ ही मॅजिक फिगर गाठली जाते, मात्र सध्या दोन्ही पक्षांतील वातावरण पाहता शिवसेना कुणाला सोबत घेऊन सत्ता स्थापन करते, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून आहे. 
 
ग्रामीण भागात जम बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला यंदाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ९ जागा  कमी झाल्या. काँग्रेसच्या ८ जागा कमी झाल्या असून, त्यांना यावेळी केवळ ८ जागाच राखता आल्या. अपक्ष चार तर माकपने ३ जागांवर विजय मिळविला आहे. सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि भाजप मिळून ४० आकडा होतो. परंतु, सद्यस्थिती आणि शरद पवारांचे  विधान ध्यानात घेता नाशिकमध्ये कुठली राजकीय गणिते जुळून येतात, याकडेही सर्वांच्या नजरा आहेत.

पंचायत समितीच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ९ जागा  कमी झाल्या. काँग्रेसच्या ८ जागा कमी झाल्या असून, त्यांना यावेळी केवळ ८ जागाच राखता आल्या. अपक्ष चार तर माकपने ३ जागांवर विजय मिळविला आहे. सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि भाजप मिळून ४० आकडा होतो. परंतु, सद्यस्थिती आणि शरद पवारांचे विधान ध्यानात घेता नाशिकमध्ये कुठली राजकीय गणिते जुळून येतात, याकडेही सर्वांच्या नजरा आहेत.

पंचायत समितीवरही शिवसेनेचाच भगवा 
नाशिक जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या १४६ जागांवर निवडणूक झाली. यात शिवसेनेनेच बाजी मारली. ६० जागा मिळवित शिवसेनेने येथे चांगली मुसंडी मारली आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादीने ३२, भाजपने २७, काँग्रेस ११, माकपने ७ जागा जिंकल्या असून, तब्बल ९ अपक्षांना मतदारांनी यंदा संधी दिली आहे.

भुसेंच्या तालुक्यात सेनेचा दारुण पराभव
शिवसेनेचा गड असलेल्या आणि राज्यमंत्री दादा भुसेंचा मतदारसंघ असलेल्या मालेगावमध्ये शिवसेनेचा दारुण पराभव झाला.  तेथे ७ पैकी ५ गटांवर भाजपने विजय मिळविला असून, शिवसेनेला अवघ्या दोनच जागांवर विजय मिळविता आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात जरी शिवसेनेने मुसंडी मारली असली तरीही मालेगाव तालुक्यात पीछेहाट झाल्याने हा पराभव शिवसेना आणि दादा भुसेंच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

दादा भुसे यांचा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा
मालेगाव तालुक्यातील गटाच्या सात जागांपैकी शिवसेनेला अवघ्या दाेन जागा मिळाल्याने ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला अाहेे. पंधरा वर्षांपूर्वी भुसे शिवसेनेत सक्रिय झाल्यापासून तालुक्यात सेनेने सातत्याने यशाला गवसणी घातली. 

तालुक्यात विराेधक असले तरी पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती सेनेच्या अंमलाखाली राहिल्या. गटांचा विचार करता सर्वाधिक जागा सेनेलाच सातत्याने मिळाल्या अाहेत. सलग तिसऱ्यांदा भुसे स्वत: विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यांनी केलेली कामे व पक्षाची वाटचाल लक्षात घेता त्यांना राज्यमंत्रिपद देखील पक्षप्रमुखांनी दिले. परंतु, सध्याच्या जि.प. निवडणुकीत सातपैकी अवघ्या दाेन जागा सेनेला मिळाल्याने या पराभवाची भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला अाहे. या संदर्भात ‘दिव्य मराठी’शी बाेलताना भुसे म्हणाले, जिल्ह्यात सेनेला गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा मिळाल्या. माझ्या तालुक्यात मात्र जागा घटल्या. त्यामुळे याची जबाबदारी देखील माझी अाहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी मंत्रिपद दिले अाहे. त्यामुळे राजीनामादेखील त्यांच्याकडे पाठवला अाहे.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, जिल्‍हा परिषदेचे पक्षीय बलाबल...  
 
बातम्या आणखी आहेत...