आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडून येण्याची क्षमता असणा-यालाच उमेदवारी - बाळासाहेब थोरात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असून, एकनिष्ठ व निवडून येणा-या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री तथा संपर्कनेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. प्रत्येक मतदारसंघात स्पर्धा होती त्यामुळे उमेदवारी देतांना कस लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रविवारी कॉँग्रेस भवनात जिल्हा परिषद गटांसाठी तीनशेहून अधिक तर गणांसाठी साधारणत: एक हजारावर इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहे. महसूलमंत्री व जिल्ह्याचे संपर्कनेते बाळासाहेब थोरात, पक्षनिरीक्षक माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, आमदार निर्मला गावित, शरद आहेर यांनी मुलाखती घेतल्या.
या वेळी सिन्नर वगळता अन्य तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. सिन्नर तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती सिन्नरमध्ये झाल्या. या वेळी पक्षनिरीक्षकांनी इच्छुकांना जात पडताळणी प्रमाणपत्र, राजकीय पार्श्वभूमी, केलेली कामे आदींबाबत माहिती देत प्रत्येकाला पक्षाने दिलेला आदेश मान्य राहील का, अशीही विचारणा केली जात होती. परंतु, या वेळी इच्छुकांनाही तिकीट मिळाले तरच आम्ही काम करू नाहीतर आम्हालाही आमचे मार्ग मोकळे आहे, असेही स्पष्टपणे या वेळी सांगितले. एकाच गणासाठी गावातील दोघेही इच्छुक मुलाखती दरम्यान आपणच इतरांपेक्षा वरचढ कसे आहोत, हे पटवून देताना अनेकदा वादाचे प्रसंग निर्माण झाले. परंतु यावेळी वरिष्ठांच्या मदतीने वादावर पडदा टाकण्यात येत होता.
देवळा पंचायत समितीच्या माजीसभापती लक्ष्मीबाई शेवाळे यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी शैलेश पवार, प्रमोद मोरे, रम्मी राजपूत आदी उपस्थित होते.