आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या तिकिटासाठी ‘कारभा-यां’ची धडपड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिंडोरी - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. नेहमीच दुर्लक्ष असलेल्या कोचरगाव गटात आता राजकीय पक्षाच्या नेत्यांचे दौरे वाढत आहे. या वेळी आरक्षण बदलल्यामुळे कोचरगाव गटात कारभारणीला उमेदवारी मिळण्यासाठी कारभा-यांना धडपड करावी लागत आहे. मतदारांच्या भेटीगाठी इच्छुकांकडून रात्रीचा दिवस केला जात आहे.
50 टक्के आरक्षण झाल्याने ग्रामपंचायतीपाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समितीत महिलाराज येणार आहे. मागील निवडणुकीत या गटातून कॉँग्रेसकडून पंडितराव गायकवाड, राष्ट्रवादीकडून संपतराव भरसट, शिवसेनेकडून सुरेश लिलके, मनसेकडून शशिकांत शेवाळे निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यात खरी लढत राष्ट्रवादी व कॉँग्रेसमध्ये होऊन राष्ट्रवादीचे संपत भरसट विजयी झाले होते. या गटात राष्ट्रवादीकडून लता मोरे, शिवसेनेकडून पंचायत समिती सदस्य मंदाकिनी चौधरी, सोनल मोरे, कॉँग्रेसकडून चंदा गायकवाड, मनसेकडून नंदिनी मोरे इच्छुक आहे. ननाशी गणात राष्ट्रवादीकडून मोखलनच्या माजी सरपंच वंदना पवार, ननाशी ग्रामपंचायत सदस्या मीराबाई गांगोडे, मीराबाई भरसट, शिवसेनेकडून सुलोचना हिंडे, सरपंच आरती भोये, मंगला गावित, सेनेकडून कांताबाई शिंगाडे इच्छुक आहे. कोचरगाव गणात शिवसेनेकडून सुदाबाई लिलके, हिराबाई लिलके, तर राष्ट्रवादीकडून पुष्पा चौधरी, मनसेकडून अश्विनी चौधरी इच्छुक आहे. मात्र, यावेळी शिवसेना व राष्ट्रवादीत चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहेत.
गटातील समस्या - रस्त्याची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, धरणांचे पाण्याचे नसलेले आरक्षण, धरणग्रस्तांना मोबदला नाही
झालेली कामे :
लघुपाटबंधारे योजनेंतर्गत अंबाड, पिंपळपाडा, आंबेगण, जोरण येथे तलावाचे काम सुरू,
15 सभामंडपाचे काम पूर्ण, शेतीपयोगी
साहित्याचे वाटप, महिलांना मोफत गॅस कनेक्शन वाटप
असे आहे आरक्षण
कोचरगाव गट : इतर मागास प्रवर्ग स्त्री
कोचरगाव गण : अनुसूचित जमाती स्त्री
ननाशी गण : अनुसूचित जमाती स्त्री