आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • A Citizen Tried To Commit Suicide Recovery Department

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंगावर रॉकेल टाकून घेतल्याने उडाला थरकाप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दुसऱ्या छायाचित्रात स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून घेणारे दीपक घाटोळे.)
धुळे- महापालिकेचा वसुली विभाग नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहत असतो. शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एका इसमाने वसुली विभागात स्वतच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्मचाऱ्यांनी त्याला रोखल्याने अनर्थ टळला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला होता.
शहरातील ऊस गल्लीतील द्रौपदाबाई शंकर खळगे या मालमत्ताधारकाकडे महापालिकेची शास्तीच्या रकमेसह लाख ७६ हजार ४७४ रुपयांची थकबाकी होती. याबाबत मनपाकडून त्यांना नोटीसही बजावण्यात आली होती. याप्रकरणी वसुली पथक दोन दिवसांपूर्वीच जप्तीच्या कारवाईसाठी गेले असता द्रौपदाबाई खळगे यांचे नातेवाईक असलेल्या दीपक शंकर घाटोळे यांनी थकीत कराच्या रकमेपोटी दोन धनादेश दिले. त्यामुळे जप्तीची कारवाई स्थगित करण्यात आली.
मात्र, शुक्रवारी दुपारी दीपक घाटोळे हे हातात रॉकेलची कॅन घेऊन वसुली निरीक्षक काशिनाथ खंदळकर यांच्या दालनाजवळ आले. त्या ठिकाणी आपल्याला अधिक कर लावण्यात आल्याचा आरोप करत कॅन उघडून त्यांनी अंगावर रॉकेल टाकून घेतले. तसेच खिशातून आगपेटी काढत पेटवण्याचा प्रयत्न केला. परंतु, खंदळकरांसह इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखून हातातून काडेपेटी कॅन हिसकावून घेतली. याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी येऊन त्यांना ताब्यात घेतले. अचानक झालेल्या या प्रकरणामुळे एकच गोंधळ उडाला. मात्र, रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलिसांत कोणताही गुन्हा दाखल नसल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.
करापोटी धनादेश
जप्तीच्या कारवाईवेळी थकीत मालमत्ता करापोटी दीपक घाटोळे यांनी १० जूनचा लाखाचा आणि १० जुलै २०१५ तारखेचा लाख ७६ हजार रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र, धनादेश वटण्याच्या भीतीतून त्यांनी रॉकेल टाकून घेण्याचा प्रकार केल्याची चर्चा मनपा आवारात होती. दरम्यान, महापालिकेचा वसुली विभाग गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे.
माहिती अधिकाराखाली दिली होती माहिती...
दीपक घाटोळे याने यापूर्वीही वसुली विभागात विविध प्रकारची माहिती माहिती अधिकाराखाली मागितली होती. ती त्यांना वेळोवेळी देण्यात आली. मात्र, कराबाबतची कागदपत्रे अग्निकांडात जळाल्याने उपलब्ध नव्हती. त्यामुळे कर भरल्याची पावती असल्यास ती दाखवण्यास सांगण्यात आले होते; परंतु ती त्यांच्याकडेही नसल्याचे मनपा कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.