आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनापरवाना, अधिक प्रवासी वाहनांवर धडक कारवाई, पहिल्या दिवशी २२ वाहने जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरात विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर शहर वाहतूक पोलिसांची शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या पथकाने शुक्रवारी संयुक्त कारवाई केली. सकाळी ते ११ या दोन तासांत अजिंठा रस्त्यावर कारवाई करून २२ वाहने ताब्यात घेण्यात आली.
शहर वाहतूक विभागाने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना परवाने काढण्यासंदर्भात एप्रिल महिन्यात सूचना केल्या होत्या. त्यानुसार काही चालकांनी परवाने काढले. मात्र, अनेक चालक अजूनही विनापरवाना वाहने चालवत आहेत. त्यामुळे वाहतूक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शुक्रवारपासून कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच दररोज शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवरही कारवाई सुरू राहणार आहे.
काय होणार कारवाई
अवैध आणि विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर चार ते सहा हजार रुपयांचा दंड किंवा वाहनाचा परवाना एक महिन्यासाठी निलंबित करण्याची कारवाई केली जाणार आहे.
जप्त करुन आरटीओ कार्यालयात आणलेली वाहने. तर कागदपत्रांची पडताळणी करताना परिवहन विभागाचे अधिकारी.
या वाहनांवर कारवाई
एमएच१९ व्ही १८८३, एमएच १९ व्ही १८८२, एमएच १९ व्ही ६८६४, एमएच १९ व्ही ०३१२, एमएच १९ एई ६४७६, एमएच १९ क्यू ७१३५, एमएच १९ बीजे ४८४६, एमएच १९ बीयू ५४५९, एमएच १९ व्ही ८५७०, एमएच १९ बीव्ही १४६८, एमएच १९ बीव्ही ३९०९, एमएच १३ एयू ०१६७, एमएच १९ वाय १९४१, एमएच १९ बीजे ६८४४, एमएच १९ व्ही ८७०६, एमएच १९- ६४६५, एमएच १९ क्यू ८०९५, एमएच ०६ जे १२६६, एमएच १९ एवाय ८१६०, एमएच १९ बीजे ५३१२, एमएच १९ व्ही ७६०२
शुक्रवार पासून सुरू झाली मोहीम
शहरात प्रवासी वाहतूक करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाचा परवाना आवश्यक असतो. नियमानुसार अॅपे, पॅजो रिक्षात चालक तीन प्रवासी असा परवाना असतो. त्यासाठी वार्षिक शुल्क भरावे लागते. त्यामुळे अनेक चालक परवाना काढतच नाहीत. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असलेल्या वाहनांवर कारवाईची मोहीम शुक्रवारपासून सुरू आहे. वाहतूक विभागाचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे, त्यांचे सहा कर्मचारी आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाचे निरीक्षक योगेश पाटील, अतुल पवार त्यांचे पथक ही कारवाई करत आहे.

शहरात विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची माेहीम सुरू केली आहे. ही मोहीम यापुढेही नियमित सुरू राहणार असून शहरातील निरनिराळ्या रस्त्यांवर ही कारवाई केली जाणार आहे.
- चंद्रकांत सरोदे, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग