आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी सैतानाची मदतही चालेल, राजू शेट्टींचे वक्तव्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदूरबार - शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नंदूरबार येथे मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांची झालेली अवस्था पाहता कर्जमाफी लवकरात लवकर होणे गरजेचे असल्याचे यावेळी राजू शेट्टी म्हणाले. शेतकऱ्यांचे प्रश्न हे केवळ विरोधकांनाच समजतात. सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही असे राजू शेट्टी म्हणाले. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी सैतानाची मदत घ्यावी लागली तरीही हरकत नाही, पण कर्जमाफी मिळवणारच असा यल्गार यावेळी राजू शेट्टी यांनी पुकारला. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
 
बातम्या आणखी आहेत...