आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनिल गोटे महायुतीकडे वळल्याने संघर्ष वाढणार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - नरेंद्र मोदींच्या लाटेवर स्वार झालेल्या महायुतीच्या कळपात जाऊन अनिल गोटे यांनी स्पर्धेत असल्याचे संकेत दिले. त्यामुळे भाजपच्या वाटेकडे डोळे लावून बसणार्‍यांच्या संख्येत एकाने वाढ झाली. तसा संघर्षही वाढला. गतवेळच्या अनुभवाच्या बळावर गोटेंनी लोकसभेसाठी पुनर्परीक्षा देण्याची तयारी चालविली आहे. तर डॉ. भामरे व सुभाष देवरेंनी स्थानिक भाजप नेत्यांच्या माध्यमातून संपर्क वाढविण्याचे काम सुरू केले आहे. तरीही तिकिटाचा पंचा कोणाच्या गळ्यात पडेल, याचा दावा कोणीही करू शकत नाही, अशी स्थिती आहे.
धुळे लोकसभेसाठी कॉँग्रेसमध्ये फारशी स्पर्धा असल्याचे दिसत नाही. भाजपकडून उमेदवारी मिळावी, यासाठी मात्र इच्छुकांची रांग वाढत आहे. नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा फायदा उठविण्यासाठी घडामोडी घडत आहेत. ज्यांची नावे चर्चेत आहेत, तेही चर्चा पुढे सुरू राहील, याची काळजी घेत आहेत. त्यातीलच एक असलेले आमदार अनिल गोटे मुळात जनसंघीय विचारांचे आहेत. त्यांच्या उमेदवारीबाबत अद्यापही निश्चितता नाही. मात्र, त्यांनी अचानक भाजप सहभागी असलेल्या महायुतीच्या व्यासपीठावर हजेरी लावल्याने राजकीय वतरुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
भाजपने अद्याप कोणालाच तिकिटाबाबत आश्वासन दिलेले नाही. अनिल गोटे, सुभाष देवरे, डॉ. सुभाष भामरे आणि अद्वय हिरे यांच्या नावानिशी भाजपने सव्र्हे केला. त्या सव्र्हेचा अहवाल उघड झालेला नाही ; परंतु राज्यस्तरावरून गतवेळी निवडून आलेल्या उमेदवारालाच तिकीट देण्याची भूमिका घेण्यात आल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर संबंधित इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या नावाची चर्चा गेल्या पंधरा दिवसांपासून मागे पडली होती ; परंतु केंद्रस्तरावरून आणखी काही सूत्रे हलली आणि इच्छुकांच्या पंखांना बळ मिळाले. त्यानंतर हालचाली सुरू झाल्या आहेत.
स्थानिक, राज्य अन् केंद्रस्तराचा पेच
काँग्रेस व भाजपाच्या तिकीटासाठी स्थानिक स्तरावरील इच्छुक सरसावले असले तरी काँग्रेसच्या तिकीट वाटपचा तिढा केंद्र स्तरावर सोडविला जाणार आहे. तर भाजपाचे अद्याप तरी तळयात मळयात आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावरील मंडळी काहीतरी भूमिका घेतील. राज्यस्तरावरून दुसरेच मत व्यक्त केले जाते. तर इच्छुक असलेले थेट दिल्ली दरबारी जाऊन केंद्र स्तरावरील नेत्यांच्या भेटी घेतात. तेव्हा हा पेच लवकर सुटणार नाही, हेच दिसून येते.
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या
अनिल गोटे यांनी पक्षाध्यक्ष राजनाथसिंग यांची गेल्या आठवड्यात भेट घेतली. तर सुभाष देवरे यांनी त्यांचे व्याही खासदार सी. आर. पाटलांसोबत दुसर्‍यांदा नरेंद्र मोदींच्या वतरुळातील बड्या नेत्याची भेट घेतली. डॉ. सुभाष भामरे यांनी अद्याप कोणाची भेट घेतल्याचे पुढे आले नसले तरी ते चक्क भाजपच्या कार्यक्रमांमध्ये सामील व्हायला लागले आहेत. पक्ष प्रवेश झालेला नसताना डॉ. भामरेंनी अचानक शिवसेनेचे व्यासपीठ सोडल्यासारखी स्थिती निर्माण केली आहे.