आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजार रुपयांची लाच; तलाठ्यासह दोघे ताब्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- तालुक्यातील मुकटी येथील शेतकऱ्याला सातबारा उतारा पत्रकाच्या मागणीसाठी एक हजार रुपयांची दुसऱ्यामार्फत लाच घेताना नीलेश पाटील या तलाठ्याला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
मुकटी येथील शेतकऱ्याची गावशिवारात जमीन आहे. या शेतातील विहीर ही वडिलोपार्जित वाटणीनुसार या शेतकऱ्याच्या काकाच्या शेतात आहे. या सामाईक विहिरीवरील पाणी मिळावे यासाठी संबंधित शेतकऱ्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी त्याने तलाठी कार्यालयात अर्ज आवश्यक कागदपत्रे जोडली होती. तसेच पाणी घेण्याचा हक्क मिळावा यासाठी पत्रक, सातबारा उतारा तसेच पत्रकावर नोंद करण्याची विनंती केली होती. या मोबदल्यात तलाठी नीलेश विश्वासराव पाटील यांनी एक हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार या पथकाने दशरथ रुमाल भील याच्यामार्फत नीलेश पाटील यांना लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शिवाजी बुधवंत, निरीक्षक विजय चौरे, सुनील भाबड, अरुण पाटील, राजेंद्र मराठे, जितेंद्रसिंग परदेशी, प्रवीण अमृतकर, दिलीप खोंडे, किरण साळी, देवेंद्र वेदे, कैलास शिरसाठ, संदीप पाटील, मनोहर ठाकूर, प्रकाश सोनार यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान पोलिसांनी अतिशय शिताफीने ही कारवाई केली. या प्रकरणाची चर्चा रंगली आहे.

रामनगरात घरझडती
देवपुरातीलरामनगर या वसाहतीत नीलेश पाटील यांचे घर आहे. कारवाईनंतर निरीक्षक भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाने रात्री उशिरापर्यंत त्यांच्या घराची झडती घेतली; परंतु त्यात काहीही मिळून आले नसल्याचे पथकाकडून सांगण्यात आले.
सलग दुसरी घटना
शेतविहिरीतीलसातबारा उताऱ्यासाठी तलाठ्याने लाच मागण्याची ही दुसरी घटना आहे. काल मंगळवारी जळगाव येथील विटनेर गावाचे तलाठी राजेंद्र बाऱ्हे यांना अशाच पद्धतीने रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले होते.