आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Book Sellers Loot Parents By Changing MRP On Books

पुस्तकांवर जादा किमतीचे बनावट स्टीकर लावून अभ्यासक्रमांच्या पुस्तकांमध्ये लूट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांची व पालकांची अडवणूक करू नये, असे शासनाचे आदेश असतानाही शाळांकडून विशिष्ट दुकानांमधून पुस्तके खरेदी करण्याची सूचना केली जाते. त्याचा गैरफायदा घेत पुस्तक विक्रेते चक्क बनावट किंमत टाकून पुस्तकांची विक्री करीत अाहेत. यातून पालकांची लूट हाेत आहे. यापूर्वीही काही शाळांमध्ये असे प्रकार घडले. मात्र, राजकीय पक्षांच्या आंदोलनामुळे ते बंद झाले. दरम्यान तीन ते चार वर्षांनंतर पुन्हा बनावट किमतीचे प्रकार उघड हाेत अाहेत.

शाळांच्या वार्षिक परीक्षा सुरू आहेत. त्यातच नर्सरी,केजीच्या प्रवेशाची धावपळ तसेच शैक्षणिक साहित्य खरेदीत पालक गुंतलेले आहेत. शहरातील बहुतांश नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांची पुस्तके शहरातील मोजक्याच पुस्तक विक्रेत्यांकडे मिळतात. पालकांनाही ठरावीक विक्रेत्यांकडून ही पुस्तके खरेदी करण्याची सूचना शाळा प्रशासनाने केली आहे. त्याचा गैरफायदा घेत पुस्तक विक्रेत्यांनी जुन्या छपाईच्या पाठ्यपुस्तकांवर चक्क स्टीकर लावून बनावट किमती टाकून विक्री सुरू केलेली आहे. त्यात कंपनीच्या मूळ किमतीच्या तुलनेत प्रत्येक पाठ्यपुस्तकामागे किमान दहा ते चाळीस रुपयांपर्यंतचे अतिरिक्त शुल्क वसूल करण्यात येत आहे. यासंदर्भात पालकांनी दुकान मालकांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केल्यास दुकानदारांकडून स्टीकर लावलेली किंमत कंपनीकडूनच येत असल्याचे सांगितले जाते.
याबाबत प्रशासनाने मध्यस्थी करीत तोडगा काढावा, अशी मागणी आता पालकांकडून हाेत अाहे. तसेच शाळांकडूनही शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदीबाबतची सक्ती करण्यात येऊ नये, यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे तसेच ग्राहकांची होणारी लूट थांबविण्यासाठी ग्राहक मंच अथवा ग्राहक संघटनांनी लक्ष घालावे, अशी मागणी पालकांनी केलेली आहे.

एमआरपीत घोळ ठरतो गुन्हा
ग्राहक संरक्षण कायद्यानुसार एमआरपीत बदल करणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी शिक्षेची तरतूदही करण्यात आलेली आहे. यासंदर्भात पालकांना ग्राहक मंचात दाद मागता येणार आहे. तशी तयारी पालकांनी करायला हवी.
पुढे वाचा, केजीच्या शिक्षणाचा खर्च २५ हजार...