आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्षभरात जळगावात कॅन्सर रुग्णालय उभारणार- दत्तात्रय देशमुख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- कॅन्सरच्या रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ त्यावर उपचारांसाठी असणारी रुग्णालयांची उणिव भरून काढण्यासाठी रोटरी क्लबतर्फे येत्या वर्षभरात जळगाव शहरात अद्यायावत कॅन्सर रुग्णालयाची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची जबाबदारी रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टची असून त्याला ३०३० डिस्ट्रीक्ट रोटरी फाऊंडेश ग्लोबल फंडांतून निधी मिळणार आहे. त्यासोबतच येत्या तीन महिन्यात कॅन्सरच्या रुग्णांसाठी ८० लाखांची मोबाईल व्हॅनही मिळणार असल्याची माहिती डिस्ट्रीक्ट ३०३० चे प्रांतपाल दत्तात्रय देशमुख यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.
ई-लर्निंगवर फाेकस : टीचर्स,लर्निंग, चाईल्ड डेव्हल्पमेंटवर फोकस करण्यात आले आहे. ग्रामिण भागात प्रामुख्याने दुर्गम भागात जेथे साधन सामुग्रीची उपलब्धता नाही अश्या भागात लर्निंगद्वारे शिक्षण सोपे करण्याचे काम सुरु आहे. रेल्वेस्थानकस्वच्छतेसाठी पुढाकार : रेल्वेतर्फेरोटरीला स्वच्छतेसाठी प्रस्ताव देण्यात आला. त्यानुसार येत्या गांधी जयंतीला (2 ऑक्‍टोंबर) जळगाव भुसावळ रेल्वेस्थानकावर 150 कचराकुंड्या ठेवण्यात येणार आहे.
जळगाव, वर्ध्याला मोबाइल व्हॅन
कॅन्सररुग्णांना रुग्णालयांपर्यंत पोहोचेपर्यंत योग्य उपचार सुरू व्हावे याची व्यवस्था असलेली ही व्हॅन असणार आहे. जळगावप्रमाणे वर्धा जिल्ह्यातील रोटरी क्लबला देण्यात येणार आहे. जळगावची मोबाइल व्हॅन ही नाशिकपर्यंत तर वर्ध्याची व्हॅन नागपूरपर्यंत कार्यरत असणार आहे.