आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्गावर सुट्या पैशांचा ‘पाऊस’, जमा करताना पाेलिसांची तारांबळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - बंगळुरूहून नोएडाच्या टाकसाळीमध्ये कोट्यवधीची चिल्लर घेऊन जाणारा ट्रक धुळे- शिरपूर रस्त्यावरील नरडाण्याजवळ मंगळवारी उलटला. त्यामुळे सात ट्रम नाणे महामार्गावर अक्षरश: गारांचा पाऊस पडावा तसे विखुरले हाेते. मात्र या राजकोषाची लूट हाेण्यापूर्वीच पोलिस यंत्रणा कामाला लागली अन् एक-एक नाणे जमा करण्यासोबत महामार्गावरील वाहतूकही सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केेले. दरम्यान, या नाण्याचे ड्रम नेण्यासाठी मुंबई येथून दुसरे वाहन मागवण्यात आले.

रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत असलेल्या बंगळुरू येथील टाकसाळीत एक व दोन रुपयांच्या नाण्यांना गोल आकार देऊन कटाई करण्यात आली हाेती. त्यानंतर राजमुद्रा व मूल्य ठसवण्यासाठी ही नाणी एका ट्रकमधून मधून नाेएडा येथे पाठवण्यात येत हाेती. मुंबई-आग्रा महामार्गावर धुळ जिल्ह्यातील नरडाण्याच्या दिशेने हा ट्रक निघाला होता. मात्र एका हाॅटेलजवळ हा ट्रक उलटला. त्यामुळे ट्रकच्या मागील बाजूस असलेले काळे ड्रम रस्त्यावर पडून फुटले व त्यातील प्लास्टिकच्या पिशवीत सुरक्षित ठेवलेली काेट्यवधींची िचल्लर महामार्गावर इतस्तत: पसरली. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील लाेक ही चिल्लर गोळा करण्यासाठी अक्षरश: रस्त्यावर धावले. मात्र हाकेच्या अंतरावर असलेले नरडाणा पोलिसांचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले व त्यांनी जमावाला राेखले.

पाेलिसांनी महामार्गावर पडलेल्या राजकोषाचा हा एेवज त्यांनी जमा करण्यास सुरुवात केली. शिवाय तातडीने एक क्रेन मागवून अपघातग्रस्त ट्रक उचलण्याच्या कामासही सुरुवात करण्यात अाली.

असा झाला अपघात नरडाणा गावाजवळ रेल्वेच्या उड्डाण पुलाजवळून वाहन जात असताना त्याची गती वाढली होती. उड्डाण पूल उतरताच चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे आधीच वेगात असलेल्या या वाहनाचा मागील संरक्षक दरवाजा तुटून ड्रम रस्त्यावर पडले. तर वाहनालाही अपघात झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

७५१ किलो नाणी वाहनामध्ये ३१ ड्रम नाण्यांनी भरले होते. अपघातामुळे संरक्षण दरवाजाजवळील सात ड्रम खाली पडले व त्यातील नाणी रस्त्यावर पसरली. संपूर्ण नाणी गोळा केल्यावर त्यांचे वजन सुमारे ७५१ किलो भरले. त्यांंच्यावर कोणताही ठसा नसल्यामुळे त्यांचे मूल्य मात्र निर्धारित केले जाऊ शकत नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.

धातू आहे अनमोल
चलनी नाणे बनवण्यासाठी अनेक धातूंचे संयुक्तीकरण करून विशिष्ट असा धातू तयार केला जातो. त्याला आकार देऊन नाणी तयार केली जातात. महामार्गावर विखुरलेली ही नाणीही याच धातूपासून निर्मित आहेत. धातू निर्मिती व नाणे तयार करण्याच्या प्रक्रियेत अर्थातच शासनाचा मोठा कालावधी व पैसा खर्च झाला आहे.