आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी धुळ्यात नगरसेवकाने दिला राजीनामा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- कोपर्डीतील गुन्हेगारांना फाशी देण्यात यावी, अॅस्टॉसिटी कायदात फेरबदल करण्यात यावा, मराठा समाजाला आरक्षण मिळावे आदी मागण्यांसाठी धुळ्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक रविराज ज्ञानेश्वर पाटील यांनी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्याने मागण्यांसाठी मराठा समाजात राजीनामा सत्र सुरु होते, की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.
उद्या धुळ्यात सकल मराठा समाजाचा मुकमोर्चा आयोजित करण्यात आला आहे. पण त्यापूर्वीच रविराज पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. समाजाच्या मागण्यांसाठी एखाद्या नगरसेवकाने राजीनामा देण्याची ही बहुदा पहिलीच वेळ आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा... या तरुणांनी मराठा समाजासाठी केले श्रमदान...
बातम्या आणखी आहेत...