आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhule District Lead In The Indradhanush Campaign

आरोग्य: इंद्रधनुष्य अभियानात धुळे जिल्हा राज्यात आघाडीवर!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- शासनाच्या लसीकरण मोहिमेंतर्गत लसीकरणापासून वंचित राहिलेले बालक तसेच मातांचा शोध घेऊन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत इंद्रधनुष्य ही विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत दोन टप्प्यात पाच हजार ५०० बालके तसेच ६०० मातांचे आतापर्यंत लसीकरण करण्यात आले आहे.
ते वर्षे वयोगटातील बालकांना वेगवेगळ्या आजारांपासून बचावासाठी शासनाकडून वेळोवेळी लसीकरण करण्यात येत असते. मात्र, ग्रामीण भागात काही बालके लसीकरणापासून वंचित राहत असल्याची बाब शासनाच्या एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. अशा बालकांचा शोध घेऊन बालक गरोदर मातांच्या लसीकरणासाठी इंद्रधनुष्य नावाने विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेसाठी एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत प्रथम मोहीम मे ते १४ मेदरम्यान दुसऱ्या टप्प्यात मोहीम राबवण्यात आली.
यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील ७४ अतिसंवेदनशील वस्त्यांची निवड करण्यात आली होती. या वस्त्यांमध्ये लसीकरण करण्यासाठी ४१ आरोग्यसेवक, ३०० परिचारिका तसेच ८२ डॉक्टरांचे पथक नियुक्त करण्यात आले. या पथकांच्या माध्यमातून लसीकरणाचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. या दोन टप्प्यातील आकडेवारी ही समाधानकारक असून सद्य:स्थितीत इंद्रधनुष्य मोहिमेत धुळे जिल्हा हा राज्यात आघाडीवर आहे. दुसरा टप्पा जून ते १५ जून या कालावधीत राबवण्यात येणार आहे. या दुसऱ्या टप्प्यात ३०० आरोग्य सत्रांमध्ये दोन हजार ७०७ बालके तसेच ३२२ गरोदर मातांना लसीकरण करण्यात येणार आहे. या तिन्ही टप्प्यांच्या माध्यमातून वंचित घटकांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे.
गरोदर मातांचेही उद्दिष्ट पूर्ण
या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात ५५३ महिलांचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले होते. त्यात ४०१ महिला तर दुसऱ्या टप्प्यात २९१च्या उद्दिष्टापैकी २८८ महिलांना लसीकरण करण्यात आले. दोन्ही टप्प्यात १७२ गरोदर मातांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
उद्दिष्ट झाले पूर्ण
इंद्रधनुष्यमोहिमेत पहिल्या टप्प्यात तीन हजार ३३४ बालकांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यात तीन हजार २७१ बालकांना लसीकरण करण्यात आले. त्यात ७२३ बालके लसीकरणातून मुक्त झाले. तसेच दुसऱ्या टप्प्यात दोन हजार २५९ बालकांचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले होते. त्यात हजार ७३ बालकांना लसीकरण झाले. त्यातून ४७८ बालकांच्या लसीकरणाची पूर्तता झाली आहे.
आतापर्यंत ५०० बालकांसह ६०० मातांना देण्यात आला लाभ
राज्यात आघाडी
- इंद्रधनुष्य मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात ९८ टक्के बालकांना तर ७३ टक्के मातांना लसीकरण करण्यात आले. तर दुसऱ्या टप्प्यात ९२ टक्के बालकांना तर ९९ टक्के मातांना लसीकरण करण्यात आले. टक्केवारीत राज्यात धुळे जिल्ह्याने आघाडी घेतली आहे.
डॉ. आर. व्ही. पाटील, माता बालसंगोपन अधिकारी