आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Disproportionate Property Found At Officers House

विस्तार अधिकाऱ्याकडे २७ लाखांचे ‘घबाड’!, सावकारेसह पत्नीवरही गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रतिकात्मक - Divya Marathi
फोटो - प्रतिकात्मक
धुळे - शिंदखेडा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संतोष सावकारे यांच्याकडे २७ लाख ३७ हजार ४२७ रुपयांची असंपदा आढळली. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून त्यांची चौकशी सुरू होती. याप्रकरणी संतोष सावकारे व त्यांच्या पत्नी सुलेशा यांच्याविरुद्ध गुरुवारी पश्चिम देवपूर पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

देवपुरातील भिवसननगरातील प्लॉट नं.४७ येथे संतोष किसन सावकारे हे राहतात. ते िशंदखेडा पंचायत समितीत ग्रामपंचायत विस्तार अधिकारी आहेत. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्यांच्या उत्पन्नाची उघड तपासणी सुरू होती. या तपासणीमध्ये संतोष सावकारे यांच्या सन २००८ पासून मे २०१३ या काळातील ज्ञात उत्पन्नाची चौकशी करण्यात आली. ही चौकशी करण्यात येत असताना सावकारे यांच्या उत्पन्नात सुमारे २७ लाख ३७ हजार ४२७ रुपयांची विसंगती अर्थात अपसंपदा आढळून आली. अपसंपदेची ही टक्केवारी सुमारे ७२.३५ टक्के एवढी आहे. याप्रकरणी सावकारे दांपत्य समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाही. अपसंपदा जमवण्यास संतोष सावकारे यांना सहकार्य केल्याबद्दल त्यांची पत्नी सुलेशा यांनाही जबाबदार धरण्यात आले आहे.

पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात सावकारे दांपत्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा सन १९८८ चे कलम १३ (१) (इ) सह १३ (२), भादंवि कलम १०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शिवाजी बुधवंत, निरीक्षक सुनील भाबड, अरुण पाटील, संतोष माळी, राजेंद्र मराठे, प्रवीण अमृतकर, मनोहर ठाकूर, प्रकाश सोनार, संतोष हिरे, देवेंद्र वेदे, संदीप कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

चौकशीत सहकार्य
चौकशीसाठी सावकारे दांपत्याने सहकार्य केले. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर अपसंपदेचा प्रकार समोर आला. यानंतर रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी बुधवंत, उपअधीक्षक