आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमणाच्या वादावरून तणाव, आग्रारोडवर मनपा अधिकारी व्यापाऱ्यांमध्ये जुंपली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- शहरातील आग्रारोडवर पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविली जात असताना व्यापारी संजय रुणवाल यांच्याकडून अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी नंदू बैसाणे यांना धक्काबुक्की मारहाण झाली. या वेळी हस्तक्षेप करणाऱ्या पोलिसांशी हुज्जत घातली. मारहाणीच्या वादाचे पडसाद जिल्हा रुग्णालयाच्या आवारातही उमटले. दरम्यान, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीही मारहाण केल्याचा आरोप रुणवाल कुटुंबीयांनी केला आहे. घटनेनंतर पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने सोमवारी सकाळी पाचकंदील परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू केली. या मोहिमेंतर्गत दुकानाबाहेर सावलीसाठी लावण्यात आलेले शेडनेट काढण्यात येत होते. पथकाचे कर्मचारी संजय रुणवाल यांच्या दुकानाबाहेर लावलेले शेडनेट काढत असताना संजय रुणवाल तावातावाने घराबाहेर पडले. त्यांनी महापालिकेचे कर्मचारी नंदू बैसाणे यांच्याशी वाद घालत त्यांना धक्काबुक्की मारहाण केली. दरम्यानच्या काळात श्रीमती रुणवाल यादेखील रागाने घराबाहेर आल्या. या वेळी मध्यस्थी करणारे शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक एम. बी. पाटील, धुळे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास भोज कर्मचाऱ्यांशीही हुज्जत घालण्यात आली. या घटनेत बैसाणे यांच्या कानाला दुखापत झाली. शिवाय ते खाली पडून जखमी झाले. काही पोलिसांनी रुणवाल बैसाणे यांना एकमेकांपासून लांब नेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यानंतरही वाद झाला.
दरम्यान, अतिक्रमण निर्मूलन पथकातील काही जणांनी श्रीमती रुणवाल यांच्याशी वाद घालून त्यांना लोटून दिले, याबाबत जाब विचारताना मनपा कर्मचाऱ्यांनी मारहाण केली, असा आरोप रुणवाल यांच्यातर्फे करण्यात आला. घटनेनंतर बैसाणे यांच्या पाठोपाठ जखमी झालेले रुणवाल यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी बैसाणे यांचे काही नातलग रुणवाल कुटुंबीयात वाद झाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी रुग्णालयात भेट दिली. तोपर्यंत रुग्णालयात व्यापारी मनपा कर्मचाऱ्यांसोबत बैसाणे-रुणवाल यांच्या नातलगांची गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिस निरीक्षक देविदास भोज, रमेशसिंग परदेशी या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात बंदोबस्त लावला. घटनेनंतर रुणवाल यांच्या दुकानाजवळ पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. या ठिकाणी दुपारपर्यंत पोलिसांची मोठ्या प्रमाणावर वाहने उभी होती. याप्रकरणी एका गटातर्फे गुन्हा दाखल झाला होता तर व्यापारी गटातर्फे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, हद्द नेमकी कुणाची...
बातम्या आणखी आहेत...