आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत; बैलगाडीतून काढण्यात आली शैक्षणिक दिंडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवापूर येथे विद्यार्थ्यांचे पारंपारिक पध्दतीने स्वागत करण्यात आले. - Divya Marathi
नवापूर येथे विद्यार्थ्यांचे पारंपारिक पध्दतीने स्वागत करण्यात आले.
नवापूर (नंदूरबार)- तालुक्यातील नवीन शैक्षणिक वर्षाला गुरुवारी सुरुवात झाली. आदिवासी सेवा सहायक व शिक्षण प्रसारक संस्था संचलित अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा बिलबारा येथे पारंपरिक पद्धतीने प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. बैलगाडीत पहिली व नवगत विद्यार्थ्यांना बसवून मिरवणूक काढण्यात आली.  यावेळी विद्यार्थी शिक्षक व पालक, सरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
गुलाब फुल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत
 
नंदुरबार या आदिवासीबहुल जिल्ह्यातील शासकीय, अनुदानित जिल्हा परिषद मराठी शाळांच्या वतीने प्रवेशोत्सव साजरा करून विद्यार्थ्यांचे दणक्यात स्वागत करण्यात आले. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळांना आजपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सर्व शाळेतील शिक्षकांनी शाळेच्या प्रवेशद्वारात उभे राहून विद्यार्थ्यांचे गुलाब फुल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शाळेची इमारत फुग्यांनी सजविली होती. प्रत्येक वर्गही सजविण्यात आला होता.
 
पालकांनीही दिला प्रतिसाद
 
आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे प्रकल्पधिकारी निमा अरोरा यांनी प्रत्येक आश्रम शाळेत प्रकल्पाचा एक प्रतिनिधी पाठवून वेगळ्या पद्धतीने प्रवेशोत्सव साजरा केला. शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत  या कार्यक्रमाला पालकांनी मोठा प्रतिसाद दिला.  
काही शाळांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनात्मक खेळ, शिक्षकांशी ओळख करण्यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.
 
पुस्तक दिन साजरा
 
विद्यालयात शाळेचा पहिला दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात आला. या प्रसंगी पुस्तके आणि खाऊ यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच दप्तरांचे वाटप करण्यात आले. सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गोड खाऊ देण्यात आला. शासकीय व अनुदानित आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...