आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यासह मेंढपाळांच्या वारसांना चार लाखांची मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- शिंदखेडा तालुक्यात गेल्या दहा दिवसांत वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यासह मेंढपाळांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मदत मिळवून देण्यासाठी आमदार जयकुमार रावल यांनी पाठपुरावा केला.

विखरण येथे वीज पडून हिलाल चतुर पाटील या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसासह शेवाडे येथे वीज पडून तीन मेंढपाळांचा मृत्यू झाला होता. हिलाल माळी यांच्या पत्नी शोभा पाटील यांना आमदार रावल यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला. या वेळी मंडळाधिकारी आर. ए. नांदोडे, एम. एल. चौधरी, तलाठी आर. बी. खैरनार, एम. एम. शास्त्री, जी. आर. राजपूत, पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. चंद्रराव साळुंखे, माजी उपसरपंच विक्रम तायडे, शंकरसिंग गिरासे, राजेंद्र गिरासे, दिनेश कोठावदे, झुलाल पाटील, लोटन पाटील, मृत शेतकऱ्याचे भाऊ यशवंत पाटील, प्रल्हाद पाटील आदी उपस्थित होते.
दरम्यान, शेवाडे परिसरातील वीज पडून मृत्युमुखी पडलेल्यांना ठेलारी बांधवांच्या वारसांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दीड लाखाची मदत देण्यात आली होती. त्याचबरोबर मेंढपाळांनाही शासनाच्या नवीन निर्णयानुसार मदत मंजूर झाली आहे. दरम्यान ही मदत मिळाल्याने सदर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्व शेतकऱ्यांनी आमदार जयकुमार रावल यांच्यासह प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
काय आहे शासन निर्णय....
शासनाच्या१३ मेच्या निर्णयानुसार नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना दीड लाखाची मदत वाढवून चार लाख रुपये करण्यात आली आहे. हा निर्णय एप्रिलपासून लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार तालुक्यात आठ दिवसांत मृत झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी एप्रिल २०१५च्या नंतर नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत झालेल्यांना चार लाखांची मदत देण्यात यावी, अशी मागणी आमदार रावल यांनी केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी ए. बी. मिसाळ, तहसीलदार गायत्री सैंदाणे यांनी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
बातम्या आणखी आहेत...