आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तृतीयपंथींना ‘आधार’ची गरज!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- तृतीयपंथी असल्याने समाजातून हेटाळणीची वागणूक तर मिळतेच ; परंतु आता कायद्याने निवडणुकीचा हक्क देऊनही तृतीयपंथींना आधार नाही. शहरात निम्म्याहून अधिक तृतीयपंथींना अद्यापही निवडणूक ओळखपत्र तसेच आधारकार्ड मिळाले नसल्याने ते भविष्यातही आपल्या हक्कापासून वंचित राहणार आहेत. त्यांच्यासाठी डिसेंबर २०१४ नंतर कोणत्याही प्रकारचा विशेष कॅम्प घेण्यात आला नसल्याने ते अद्यापही विना‘आधार’ भटकत आहेत.
शासनाने तृतीयपंथींना निवडणुकीसह इतर आधार देण्याचे निश्चित केले; परंतु त्यांची नोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्न झालेले नाहीत. धुळे शहरात राही फाउंडेशनच्या सहकार्याने डिसेंबर २०१४मध्ये स्पेशल कॅम्प झाला; परंतु त्यात केवळ सात ते आठ जणांची नोंद झाली. शहरात मार्चअखेरपर्यंत ३६ तृतीयपंथींची नोंद आहे. याचा अर्थ आतापर्यंत २५ टक्के तृतीयपंथींची नोंद आधारकार्डासाठी करण्यात आलेली आहे. बऱ्याच तृतीयपंथींकडे आधारकार्ड नसल्याने रहिवासाचा पुरावा नाही. त्यामुळे त्यांना निवडणूक ओळखपत्रही अद्याप मिळू शकलेले नाही. त्यामुळे योजनांचा लाभ त्यांना मिळत नाही. शहरात नोंदणीकृत ३६ तृतीयपंथी आहेत; परंतु नाेंद नसलेल्या तृतीयपंथींची संख्या त्याहून जास्त असू शकते. नांेदणीकृत तृतीयपंथींबरोबरच त्यांच्यामध्ये असलेल्या विविध आठ उपप्रकारांपैकी केवळ ८०० जणांची आधार नोंदणी केलेली आहे; परंतु एकूण त्यांची संख्या १६०० हून अधिक आहे. त्यामुळे निम्म्याहून अधिक आधार नोंदणीपासून वंचित आहेत.
केवळ एकदाच झाला कॅम्प
तृतीयपंथींच्या आधार नोंदणीसाठी केवळ डिसेंबर २०१४मध्येच राही फाउंडेशनच्या कार्यालयात कॅम्पचे अायोजन करण्यात आले होते; परंतु दर तीन महिन्यांमध्ये संस्थेच्या सर्व्हेत तृतीयपंथींची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी किमान सहा महिन्यांतून एकदा आधार कॅम्प आयोजित करणे आवश्यक आहे. दरम्यान, या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
- तृतीयपंथी हेही समाजाचा एक भाग आहेत. लग्नसमारंभ, जन्मोत्सवात त्यांना मान असला तरी प्रत्यक्षात कायम हेटाळणीपूर्ण वागणूक, बेरोजगारी त्यांच्या वाट्याला आहे. त्यामुळे ते भिक्षुकी करतात. प्रसंगी देहविक्री करतात. त्यामुळे त्यांना त्यांचे हक्क मिळणे आवश्यक आहे; परंतु त्यासाठी शासकीय आधार नोंदणी, निवडणूक ओळखपत्रही त्यांना गरजेचे आहे.
संगीता तांबे, समन्वयक,राही फाउंडेशन
बातम्या आणखी आहेत...